चित्रपटांच्या प्रमोशनला कलाकारांची टाळाटाळ!

प्रमोशनसाठी वेळ देत नसल्यामुळे निर्मात्यांमध्ये नाराजी!

    24-Sep-2026
 
 
kavade
 
 
 
 
कपिल देशपांडे
मुंबई - milind kavade Onkar Bhojaneमराठी कलाकार चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी वेळ देत नाहीत असा आता सगळ्याच निर्मात्यांचा सूर निघू लागलाय. नुकतंच एका चित्रपटाच्या निर्मात्यांनी अभिनेता अंकित मोहनवर सहकार्य करत नसल्याचे आरोप केले होते. आता निर्माता- दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी अभिनेता ओंकार भोजने अत्यंत अव्यावसायिक असून त्याच्या विरोधात चित्रपट महामंडळात तक्रार करणार असल्याचे सांगत संताप व्यक्त केलाय.

मिलिंद कवडे निर्मित- दिग्दर्शित 'अफरातफरी' हा चित्रपट 9 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झालीये. चित्रपटात कलाकारांची तगडी फौज असून सगळेच प्रमोशनसाठी वेळ देतायेत, पण ओंकार भोजने केवळ आश्वासन देऊन प्रमोशनसाठी आलाच नसल्याचं कवडेंनी सांगितलं. नवीन कलाकार अत्यंत अव्यावसायिक असतात ओंकार भोजने याचं उत्तम उदाहरण असल्याचं मिलिंद कवडे यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितलं.milind kavade Onkar Bhojane

आता मुद्दा हा आहे कि केवळ कवडे यांनाच हे सोसावे लागतंय का ? तर नाही! आज कलाकार चित्रपटाचे प्रमोशन करायलाच मागत नसल्याचे चित्र इंडस्ट्रीत उभं आहे. निर्माता करोडो रुपये खर्च करून चित्रपट बनवतो, अनेक स्वप्न बघतो पण कलाकारांच्या या अशा वागण्यामुळे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा तरी कसा असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे. दिग्दर्शक- अभिनेता प्रवीण तरडे यांनाही हा अनुभव 'देऊळ बंद २'च्या वेळेस आला होता. कलाकार प्रमोशनला येत नसल्याची खंत हि त्यांनी बोलून दाखवली होती. आता प्रवीण तरडे आणि मिलिंद कवडे यांच्यासारख्या दिग्ग्ज दिग्दर्शकांची हि अवस्था असेल तर नवख्या निर्माता आणि दिग्दर्शकांनी काय करावे असा प्रश्न साहजिकच पडणे स्वाभाविक आहे. आधीच मराठी चित्रपट बऱ्याच अडचणींचा सामना करत प्रदर्शनापर्यंत पोहचतो, त्यात आता हि नवीन समस्या उभी राहिल्यामुळे निर्माते चिंतेत आहेत.milind kavade Onkar Bhojane

नुकतंच 'देव घर ऑन रेन्ट'च्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी अंकित मोहन अनुपस्थित असल्याबद्दल निर्मात्या पूनम चौधरी पाटील यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की अंकितने त्यांचे फोनच उचलले नाहीत. आणि नंतर "Don't call मी" असा मेसेज केला. यामुळे अंकितच्या अशा वागण्यामुळे निर्माते त्याच्यावर नाराज झालेत.milind kavade Onkar Bhojane

आता ज्या निर्माता दिग्दर्शकांनी या गोष्टीला वाचा फोडली, किंवा याबद्दल व्यक्त झालेत, त्यामुळे हे समोर तरी आलं. पण अजूनही असे अनेक छोटे निर्माते आहेत त्यांना हे सगळं सोसावं लागतंय. आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा असे कलाकारांना वाटत नाही का ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. एकीकडे मोहन जोशी आणि मोहन आगाशे यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार उत्साहाने प्रमोशनसाठी सहभागी होतात, पण मग युवा कलाकार आपल्याच चित्रपटाविषयी अशी तळमळ का दाखवत नाही हे कोडं न उलगडणार आहे. milind kavade Onkar Bhojane




संबंधित मजकूर