चंदगडमध्ये कळपासोबत दिसला काळा कोल्हा; कशामुळे बदलला रंग ?

    24-Sep-2026
melanistic jackal


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरात रात्रीच्या सफारीदरम्यान काळ्या रंगाचा कोल्हा आढळून आला आहे (melanistic jackal). वन्यजीव निरीक्षक शिवम खाडे यांना हा कोल्हा आपल्या कळपासोबत वावरताना दिसला (melanistic jackal). सामान्यतः मातकट किंवा तपकिरी रंगाचा दिसणारा सोनेरी कोल्हा पूर्णपणे काळ्या रंगात आढळल्याने या निरीक्षणाने वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष वेधले आहे (melanistic jackal). रंगातील हा बदल मेलेनिझम या नैसर्गिक आनुवंशिक स्थितीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. (melanistic jackal)
 
 
जगभरात कोल्ह्यांच्या विविध प्रजाती आढळतात. भारतात मात्र सर्वसाधारणपणे आढळणारी प्रजाती म्हणजे गोल्डन जॅकल किंवा सोनेरी कोल्हा. जंगलांपासून गवताळ प्रदेश, शेतीक्षेत्र, कांदळवन आणि मानवी वस्तीच्या आसपासच्या अधिवासांपर्यंत या प्रजातीचा वावर दिसतो. मुंबई परिसरातही कांदळवनांमध्ये सोनेरी कोल्ह्यांच्या नोंदी झाल्या आहेत.कोल्हा, लांडगा आणि रानकुत्रा हे तिन्ही श्वान कुळातील प्राणी असले तरी त्यांची शरीरयष्टी आणि बाह्यरूप वेगवेगळे आहे. कोल्हा तुलनेने लहान व सडपातळ असतो. त्याचे कान मोठे आणि शेपटी झुबकेदार असते. रानकुत्र्याची शरीरयष्टी मध्यम असून त्याचा रंग प्रामुख्याने लालसर-तपकिरी असतो. लांडगा मात्र आकाराने मोठा, मजबूत, लांब पायांचा आणि रुंद छातीचा असतो. त्यामुळे या तिन्ही प्राण्यांची ओळख त्यांच्या आकारमानाबरोबरच शरीररचना आणि रंगावरूनही करता येते.
 
 
चंदगडमधील कोल्ह्याचे वैशिष्ट्य मात्र त्याचा काळा रंग आहे. या कळपातील इतर कोल्हे नेहमीच्या तपकिरी-मातकट रंगाचे दिसत असताना एक कोल्हा पूर्णपणे काळ्या रंगाचा असल्याचे निरीक्षण करण्यात आले. वन्यजीवांमध्ये शरीराचा रंग निश्चित करण्यात मेलॅनिन या रंगद्रव्याची महत्त्वाची भूमिका असते. त्याच्या निर्मितीशी संबंधित आनुवंशिक बदलांमुळे एखाद्या प्राण्याच्या शरीरावर नेहमीपेक्षा अधिक गडद रंग दिसू शकतो.शरीरात मेलॅनिनचे प्रमाण किंवा त्याची निर्मिती वाढल्याने प्राणी असामान्यपणे गडद किंवा पूर्णपणे काळा दिसू शकतो. या स्थितीला मेलेनिझम (Melanism) म्हणतात. त्यामुळे चंदगडमध्ये दिसलेला हा पूर्णपणे काळ्या रंगाचा कोल्हा मेलेनिस्टिक गोल्डन जॅकल असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यापूर्वीही असामान्य रंगाच्या कोल्ह्याची नोंद झाली आहे. बारामतीच्या गवताळ प्रदेशात अंशतः काळ्या रंगाचा कोल्हा आढळल्याचे निरीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर आता चंदगडमध्ये पूर्णपणे काळ्या रंगाचा कोल्हा कळपासोबत आढळल्याने महाराष्ट्रातील सोनेरी कोल्ह्यांमधील रंगवैविध्याची आणखी एक नोंद समोर आली आहे.




संबंधित मजकूर