मुंबई (विशेष प्रतिनिधी) - धुळ्याच्या माळरानावर अलीकडेच अत्यंत फिकट, जवळपास पांढऱ्या रंगाचा एक लांडगा दिसून आला असून, त्याच्या असामान्य बाह्यरूपामुळे वन्यजीव अभ्यासक आणि संशोधकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे (dhule indian wolf). या लांडग्याचा रंग नैसर्गिक जनुकीय बदलामुळे पांढरा झाला आहे का, तो लांडगा-कुत्रा संकरित आहे का किंवा तो पूर्वी नोंद झालेल्या संकरित लांडग्याच्या पिल्लांपैकी एक आहे का, याबाबत आता प्रश्न उपस्थित झाले आहेत (dhule indian wolf). मात्र, केवळ बाह्यरूपाच्या आधारे या लांडग्याला ‘ल्यूकिस्टिक’ किंवा ‘हायब्रिड’ ठरवणे घाईचे ठरेल (dhule indian wolf). या प्राण्याची निश्चित ओळख करण्यासाठी छायाचित्रात्मक नोंदींसोबतच केस, विष्ठा किंवा इतर जैविक नमुन्यांच्या आनुवंशिक तपासणीची आवश्यकता असू शकते. (dhule indian wolf)
धुळे जिल्ह्याचे माळरान भारतीय लांडग्यांच्या अभ्यासासाठी विशेष महत्त्वाचे आहे. धुळ्याची माळराने यापूर्वीही लांडगा-कुत्रा संकराच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहेत. महाराष्ट्रात वेगळ्या रंगाचे आणि बाह्यरूपाचे लांडग्यासारखे दिसणारे प्राणी आढळल्यानंतर नागरिक वैज्ञानिक, वन्यजीव अभ्यासक आणि संशोधकांनी त्यांचे निरीक्षण केले. पुढे या निरीक्षणांना आनुवंशिक संशोधनाची जोड मिळाली. महाराष्ट्रातील लांडगा-कुत्रा संकराचा विषय केवळ अंदाजापुरता राहिलेला नाही. लांडगा-कुत्रा संकर असल्याचे आनुवंशिक पुरावे मिळाले असून या संकरित प्राण्यांची निरीक्षणे महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमधून झाली आहेत.
यामुळे धुळ्याच्या माळरानावर दिसणाऱ्या प्रत्येक असामान्य रंगाच्या लांडग्याकडे केवळ ‘वेगळ्या रंगाचा लांडगा’ म्हणून पाहण्याऐवजी त्यामागील जनुकीय कारणांचा शोध घेण्याचे महत्त्व वाढते. सध्या चर्चेत असलेल्या लांडग्याच्या रंगामुळे सर्वप्रथम ल्यूकिझम (Leucism) या जनुकीय स्थितीचा प्रश्न उपस्थित होतो. त्यानंतर हा लांडगा संकरित लांडगा असू शकतो का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हा प्राणी पूर्वी आढळलेल्या संकरित लांडग्याच्या वंशातील पिल्लू आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाल्याचे गोल्डन अर्थ बायोपिझर्व्ह फाऊंडेशनचे संस्थापक उमाकांत पाटील यांनी सांगितले. यातील कोणती शक्यता खरी आहे, हे ठरवण्यासाठी छायाचित्रे, व्हिडिओ, क्षेत्रीय निरीक्षणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनुवंशिक तपासणी आवश्यक आहे.