'गोंधळ'च्या ऑस्कर निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अनुराग काश्यपला दिग्दर्शक संतोष डावखर यांचे चोख उत्तर !

    24-Sep-2026
 
 
anurag
 
 
 
 
 
मुंबई - anurag kashyap gondhal Santosh Davakharऑस्करसाठी भारताकडून मराठी ‘गोंधळ’ या सिनेमाची अधिकृत निवड झाली आहे. मात्र, आपण ऑस्करसाठी चुकीच्या सिनेमांची निवड केल्याचं दिग्दर्शक अनुराग कश्यपने म्हटलंय. अनुरागच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता अनुरागच्या या वक्तव्यावर ‘गोंधळ’ सिनेमाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
सोशल मीडियावर पोस्ट करत संतोष डावखर म्हणाले कि , “मी अनुराग कश्यप यांचा आणि त्यांच्या फिल्म मेकिंगचा खूप आदर करतो. बंगळुरू-मुंबई विमानप्रवासादरम्यान मी त्यांना ‘गोंधळ’बद्दल सांगितले होते. ते म्हणाले की, त्यांनी त्याबद्दल ऐकलेही नाही किंवा पाहिलेही नाही, पण ते सिनेमा नक्कीच पाहतील. पण त्यानंतर सिनेमा प्रेक्षकांसाठी प्रदर्शित झालेला नाही किंवा त्यांचे मुंबईत स्क्रीनिंगही झाले नाही. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की, कोणतेही मत बनवण्यापूर्वी चित्रपट नक्की पाहा. चित्रपटसृष्टीबाहेरून आलेल्या एका नव्या दिग्दर्शकाने बनवलेला ‘गोंधळ’ हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. या चित्रपटात मराठी संस्कृतीबरोबरच जागतिक प्रेक्षकांना भावेल असा आशयही पाहायला मिळेल. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तयार करण्यात आला आहे, ओटीटीसाठी नाही. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही देशाला निराश करणार नाही, असे म्हणत संतोष यांनी अनुरागच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.anurag kashyap gondhal Santosh Davakhar
 
‘Variety India’ला दिलेल्या मुलाखतीत, अनुराग कश्यपला भारताला ऑस्कर का मिळत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मत व्यक्त करताना अनुराग म्हणाला कि , आपण अगदी चुकीचे चित्रपट निवडतो. विशेष म्हणजे, ‘गोंधळ’ हा भारताकडून यंदा पाठवण्यात आलेला चित्रपट त्यांनी अद्याप पाहिलेला नसल्याचंही स्पष्ट केलं. भारताकडे ‘द लंचबॉक्स’ आणि ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ यांसारख्या योग्य चित्रपटांची निवड करण्याची संधी होती. मात्र, त्याच्या मते फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ही संधी गमावली असल्याचं अनुरागने म्हंटल.anurag kashyap gondhal Santosh Davakhar
 




संबंधित मजकूर