मुंबई -Ankit Mohan Devghar On Rent गेल्या काही दिवसांपासून कलाकार विरुद्ध निर्माता -दिग्दर्शक हा वाद रंगू लागलाय. कलाकार चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी वेळ देत नसल्यामुळे निर्मात्यांनी आता या विषयवार बोलायला सुरुवात केलीये. 'देवघर ऑन रेंट' चित्रपटाच्या ट्रेलरलाँच कार्यक्रमापासून या वादाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या वेळी निर्मात्या पूनम चौधरी पाटील यांनी अंकित त्यांचे फोन उचलत नसल्याचं सांगितलं होत. त्यानंतरही अंकित कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याचे बघून निर्मात्यांनी आता नुकसान भरपाई म्हणून त्याला तब्बल १ कोटी रुपये देण्याची कायदेशीर नोटीस पाठवली आहे, यावर अंकितनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून 'योग्य वेळ अली कि बोलू ' असं सूचक विधान केलंय. त्यामुळे हा वाद अजून चिघळण्याची शक्यता आहे.
अंकित सगळ्याच प्रोमोशनल कार्यक्रमांपासून लांब असल्यामुळे निर्मात्यांनी तो आपले कॉल उचलत नाही, कोणी मेसेज केले तर ब्लॉक करतो असे आरोप त्याच्यावर केले होते. तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली होती. नुकतंच 'मुंबई तरुण भारत'ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीही ओंकार भोजनेवर अव्यावसायिक आणि खोटारडा असल्याचे आरोप प्रोमोशनसाठी सहकार्य करत नसल्याचे म्हंटले होते. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले. त्यात 'देवघर ऑन रेंट' च्या निर्मात्यांनी अंकिताला कायदेशीर नोटिस पाठवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कदाचित प्रोमोशनसाठी वेळ देत नाही म्हणून नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस पाठवण्याची हि पहिलीच वेळ असावी. यामुळे भविष्यात अशा गोष्टींना आळा बसण्याची शक्यता आहे.Ankit Mohan Devghar On Rent
आता ज्या निर्माता दिग्दर्शकांनी या गोष्टीला वाचा फोडली, किंवा याबद्दल व्यक्त झालेत, त्यामुळे हे समोर तरी आलं. पण अजूनही असे अनेक छोटे निर्माते आहेत त्यांना हे सगळं सोसावं लागतंय. आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा असे कलाकारांना वाटत नाही का ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. एकीकडे मोहन जोशी आणि मोहन आगाशे यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार उत्साहाने प्रमोशनसाठी सहभागी होतात, पण मग युवा कलाकार आपल्याच चित्रपटाविषयी अशी तळमळ का दाखवत नाही हे कोडं न उलगडणार आहे.Ankit Mohan Devghar On Rent
---------------------------------------
आम्ही अंकिताला खूप कॉल केले. त्याने एकही कॉल उचलला नाही. निर्माता इतके पैसे सिनेमात गुंतवतो आणि कलाकार प्रोमोशनसाठी वेळच देणार नसेल तर आमचं नुकसान होता. अंकित सरांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी चर्चा करायला हवी होती, पण ते चर्चा करायला तयार नसतील तर कसं करावं. अंकितसोबत काम केलेल्या कलाकारांनीही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही कुठला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेवटी आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. जर ते अजूनही प्रोमोशनसाठी यायला तयार झाले नाहीत तर त्यांना आम्हाला 1 कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागेल.Ankit Mohan Devghar On Rent
सचिन रोडे-पाटील, निर्माता
---------
मी मराठी नसलो, तरी तुम्ही मला मनापासून आणि प्रेमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून स्वीकारलं, हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. माझ्यासाठी काम हीच पूजा आहे. जर मी कुठे उपस्थित नव्हतो, तर त्यामागचं एकमेव कारण म्हणजे माझ्या आधीपासून ठरलेल्या कामाच्या कमिटमेंट्स होत्या. माझ्या बाजूची सत्य परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा तुम्हा सगळ्यांना पूर्ण अधिकार आहे. आणि लवकरच माझ्या बाजूची ही गोष्टही मी तुमच्यासमोर मांडेन. माझ्या बाजूने हे कधीच कोणतीही पीआर स्ट्रॅटेजी नव्हती. चला, चित्रपटाला मनापासून शुभेच्छा देऊया आणि चित्रपटाला खूप मोठं यश मिळो, अशी सदिच्छा व्यक्त करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!Ankit Mohan Devghar On Rent
अंकित मोहन, सोशल मीडिया पोस्ट