लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड !

    23-Sep-2026
 
nagarkar
 
 
 
 
मुंबई - Shakuntala Nagarkar ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांनी वयाच्या 66व्या वर्षी अखेरचा श्वास आहे. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालेलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, त्यातच त्यांचं दुर्देवी निधन झालंय. शकुंतलाताई नगरकर यांच्या निधनामुळे लावणी आणि महाराष्ट्राच्या लोककला क्षेत्रातील अनेक कलाकार, रसिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जातोय.
शकुंतलाताई यांचा जन्म 1960 मध्ये अहिल्यानगरच्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आई छबूबाई नगरकर याही त्या काळातील नामांकित लावणी कलावंत. घरातूनच लावणीचा वारसा लाभलेल्या शकुंतलाताईंनी वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी कलाक्षेत्रात पाऊल ठेवलं. शकुंतला नगरकर यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल पाच दशकांहून अधिक काळ लावणी कलेला दिला. 1974 मध्ये मुंबईतील गिरणगावातील प्रसिद्ध लालबागच्या 'हनुमान थिएटर'मध्ये त्यांच्या लावणीचा प्रवास खऱ्या सुरु झाला. अनेक दशकं त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. Shakuntala Nagarkar
शकुंतला ताईंनी पारंपरिक शैलीवर अवलंबून न राहता कथ्थक गुरु वसंराव घाटगे यांच्याकडून नृत्याचे शासत्रोक्त शिक्षण घेतलं. त्यांनी नव्या पिढीपर्यंत लावणी पोहोचवण्यासाठी 'लावणी के रंग' आणि 'लव्ह अँड लावणी' यांसारखे वेगळे प्रयोग केले.लोककलेला त्यांनी आपलं अवघं आयुष्य वाहून घेतलं . त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेत शासनानं आणि विविध संस्थांकडून त्यांना गौरवण्यात आलेलं. शकुंतलाताई नगरकर यांचा 'शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार', 2018 मध्ये 'मुंबई महापौर पुरस्कार' आणि 2023 मध्ये 'नाट्य गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आलेलं.Shakuntala Nagarkar
 




संबंधित मजकूर