
मुंबई : mukkam post bombilwadi national award ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विवेक फिल्म्स , मयासभा करमणूक मंडळी एलएलपी निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा वितरण सोहळा मंगळवारी गुजरातमधील एकता नगर, केवडिया येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडला. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार देण्यात आले.
याशिवाय ‘घरत गणपती’मधील ‘नवसाची गौरी माझी’ या गीतासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथेचा पुरस्कार मिळाला.mukkam post bombilwadi national award
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील पाच दशकांहून अधिक काळाच्या योगदानासाठी २०२४ चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘चंदू चॅम्पियन’साठी कार्तिक आर्यन आणि ‘ब्रह्मयुगम’साठी ममूटी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ‘आर्टिकल ३७०’मधील भूमिकेसाठी यामी गौतम यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. ‘आर्टिकल ३७०’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, तर राजकुमार राव अभिनीत ‘श्रीकांत’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तमिळ अभिनेता धनुषच्या ‘रायन’ला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’ला विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला.mukkam post bombilwadi national award
यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा प्रथमच दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आला. एकता नगर येथे झालेल्या या सोहळ्यात विविध भारतीय भाषांतील चित्रपट आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला.mukkam post bombilwadi national award