मुंबई (Mirabai Chanu Asian Games 2026): भारतीय स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने एशियन गेम्स २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत भारताला रौप्यपदक पटकावून दिले आहे. एशियन गेम्सच्या इतिहासात मीराबाईचे हे पहिलेच पदक ठरले आहे. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅचमध्ये ८७ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १११ किलो असे एकूण १९८ किलो वजन उचलत ही यशस्वी कामगिरी केली. तब्बल २८ वर्षांनंतर भारताला वेटलिफ्टिंगमध्ये पुन्हा रौप्यपदक मिळाले आहे. या स्पर्धेत उत्तर कोरियाच्या री सोंग-गम हिने एकूण २१५ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. एशियन गेम्समधील री सोंग-गमचे हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे.(Mirabai Chanu Asian Games 2026)
Proud Moment for India!
Heartiest congratulations to @mirabai_chanu on winning the Silver Medal in the Women’s 49kg Weightlifting event at the Asian Games 2026!
Her determination, strength and exceptional performance have once again made the nation proud. Wishing her continued… pic.twitter.com/epfb7XWvl7
सन १९५१ मध्ये एशियन गेम्समध्ये वेटलिफ्टिंगचा समावेश झाल्यापासून भारताने आतापर्यंत एकूण १५ पदके (६ रौप्य आणि ९ कांस्य) जिंकली आहेत. मात्र, सुवर्णपदकाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. १९९८ च्या बँकॉक एशियन गेम्समध्ये कर्णम मल्लेश्वरी हिने रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर तब्बल २८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मीराबाई चानूच्या रूपाने भारताला वेटलिफ्टिंगमध्ये पुन्हा रौप्यपदक मिळाले आहे. (Mirabai Chanu Asian Games 2026)
MIRABAI CHANU MAKES INDIA PROUD AGAIN!
Silver in the women’s 49kg weightlifting at Asian Games 2026 with a total lift of 198kg
Her first-ever Asian Games medal and India’s first weightlifting medal at the Games in 28 years
मीराबाई चानूचा एशियन गेम्समधील प्रवास २०१४ च्या इंचियोन स्पर्धेपासून सुरू झाला. त्यावेळी महिलांच्या ४८ किलो गटात ती नवव्या स्थानावर राहिली होती. २०१८ च्या जकार्ता एशियन गेम्समध्ये दुखापतीमुळे तिला सहभागी होता आले नाही. त्यानंतर २०२२ च्या हांगझोऊ एशियन गेम्समध्ये पुनरागमन करत तिने महिलांच्या ४९ किलो गटात १९१ किलो वजन उचलून चौथे स्थान मिळवले होते. आता २०२६ मध्ये तिने अखेर एशियन गेम्सचे पहिले पदक आपल्या नावावर केले आहे. (Mirabai Chanu Asian Games 2026)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक