मुंबई (Galaxy Z Fold8 EMI Offer) : सॅमसंग इंडियाने आपल्या गॅलेक्सी फॉरएव्हर प्रोग्राम अंतर्गत अत्याधुनिक फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन्स - गॅलेक्सी झेड फोल्ड ८ आणि गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा साठी नवीन, स्थिर पेमेंट योजना सुरू केली आहे. ही नाविन्यपूर्ण योजना गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसची मालकी मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आणि परवडणारे बनवते.
या दोन वर्षांच्या प्रोग्राम अंतर्गत, ग्राहक २४ महिन्यांच्या ईएमआयमध्ये विभागून गॅलेक्सी फॉरएव्हर प्रोग्राम शुल्कासह डिवाईसच्या मूळ किमतीच्या केवळ ६० टक्के रक्कम भरून गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा आणि गॅलेक्सी झेड फोल्ड ८ खरेदी करू शकतात. यामुळे २४ महिन्यांसाठी ईएमआय २५ टक्क्यांनी कमी होतो, ज्यामुळे हप्ते भरणे अधिक सोपे होते. या प्रोग्रामद्वारे, गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्राचा ईएमआय ९ हजार ४१७ रुपयांवरून घसरून ६हजार ९९७ रुपये होतो, तर गॅलेक्सी झेड फोल्ड ८ चा ईएमआय ८ हजार ५८४ रुपयांवरून घसरून ६ हजार ४१६ रुपये होतो. (Galaxy Z Fold8 EMI Offer)
'गॅलेक्सी फॉरएव्हर' प्रोग्रामअंतर्गत २४ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर डिव्हाइसच्या किमतीची उर्वरित ४० टक्के रक्कम 'बुलेट पेमेंट' म्हणून एकरकमी देय असेल. हा २४ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ग्राहकांसाठी तीन सोपे पर्याय उपलब्ध असतील: ग्राहक त्यांचे जुने डिव्हाइस परत करून नवीन गॅलेक्सी डिव्हाइस मिळवू शकतात (अपग्रेड), उर्वरित ४० टक्के बुलेट पेमेंट भरून ते डिव्हाइस स्वतःकडेच ठेवू शकतात (रिटेन), किंवा डिव्हाइस सहजपणे परत करून या प्रोग्राममधून बाहेर पडू शकतात (रिटर्न). याव्यतिरिक्त, ग्राहकांना २४ महिने पूर्ण होण्यापूर्वीही डिव्हाइस परत करण्याचा किंवा अपग्रेड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे; ज्यासाठी कोणतीही विचारणा न करता निश्चित बायबॅक मूल्य दिले जाते. यानुसार, १० ते ११ महिन्यांत ५५ टक्क्यांपर्यंत, १२ ते १३ महिन्यांत ५० टक्क्यांपर्यंत, १४ ते १८ महिन्यांत ४५ टक्क्यांपर्यंत आणि १९ ते २५ महिन्यांच्या कालावधीत डिव्हाइस परत केल्यास मूळ किमतीच्या ४० टक्क्यांपर्यंत खात्रीशीर बायबॅक (ॲश्युअर्ड बायबॅक) मिळण्याची हमी दिली जाते. (Galaxy Z Fold8 EMI Offer)
गॅलेक्सी फॉरएव्हर प्रोग्राममध्ये सॅमसंग केअर+ चा देखील समावेश आहे, जे कोणत्याही क्लेम प्रोसेसिंग शुल्काशिवाय नकळतपणे खाली पडल्यामुळे आणि पाण्यामुळे होणा-या नुकसानासाठी संरक्षण प्रदान करते. याचा अर्थ ग्राहकांना सॅमसंग केअर+ स्वतंत्रपणे खरेदी करण्याची गरज नाही, ते पॅकेजचा भाग आहे.
कमी मासिक ईएमआय, खात्रीशीर बायबॅक पर्याय आणि डिवाईस संरक्षणाचा एकत्रित लाभ देऊन गॅलेक्सी फॉरएव्हर ग्राहकांना अतुलनीय स्थिरताआणि मानसिक शांतता प्रदान करते. तुम्ही तुमचे सध्याचे गॅलेक्सी फोल्डेबल स्वतःकडेच ठेवणे पसंत करा किंवा नवीन मॉडेलमध्ये अपग्रेड करणे निवडा, हा प्रोग्राम तुम्ही नेहमी भविष्यासाठी सज्ज राहाल याची खात्री देतो. (Galaxy Z Fold8 EMI Offer)