_202609231908391831_H@@IGHT_350_W@@IDTH_696.png)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘बर्डलाईफ इंटरनॅशनलच्या स्टेट आॅफ दी वर्ल्ड बर्डस्-२०२६’च्याअहवालात अहवालानुसार, जगातील १ हजार ८४३ पूर्णपणे स्थलांतर करणाऱ्या पक्षीप्रजातींपैकी तब्बल ४५ टक्के प्रजातींच्या जागतिक संख्येत घट होत आहे (migratory birds arriving in India). भारतासाठी विशेष महत्त्वाच्या असणाऱ्या पक्षी स्थलांतराच्या मध्य आशियाई आकाशमार्गामध्येही ४४ टक्के स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे (migratory birds arriving in India). भारतातील पाणथळ जागा, किनारी अधिवास, गवताळ प्रदेश आणि पश्चिम घाट यांचे संरक्षण त्यामुळे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. (migratory birds arriving in India)
स्थलांतरित पक्षी वर्षातील वेगवेगळ्या काळात प्रजनन, विश्रांती आणि खाद्य मिळविण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. या पक्ष्यांच्या वापरातील व्यापक मार्गांना ‘फ्लायवे’ म्हटले जाते. मध्य आशियाई आकाशमार्ग हा भारतासाठी पक्षी स्थलांतराच्या अनुषंगाने महत्त्वाचा मार्ग म्हणून अधोरेखित होतो. या फ्लायवेमध्ये ४१२ स्थलांतरित पक्षीप्रजातींचा समावेश आहे. विशेषतः पश्चिम घाट परिसरात मध्य आशियाई आकाशमार्गामधील स्थलांतरित पक्ष्यांसाठी अनेक जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण क्षेत्रे (Key Biodiversity Areas – KBAs) ओळखण्यात आली आहेत. यामध्ये भीमाशंकर, कोयना, राधानगरी, तानसा, फणसाड या अभयारण्यांचा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी परिसराचा समावेश आहे.
अहवालातील आकडेवारीनुसार, मध्य आशियाई आकाशमार्गामधील ४४ टक्के स्थलांतरित पक्ष्यांच्या जागतिक संख्येत घट होत आहे. तुलनेत सर्व स्थलांतरित पक्ष्यांचा विचार केल्यास ४५ टक्के प्रजाती घटत्या प्रवाहात आहेत, ३० टक्के स्थिर, १४ टक्के वाढत्या प्रवाहात असून ११ टक्के प्रजातींबाबत पुरेसा कल उपलब्ध नाही. अहवालाचा भारताच्या संदर्भातील मुख्य संदेश असा आहे की, स्थलांतरित पक्ष्यांचे संवर्धन केवळ पक्षी येतात त्या ठिकाणांचे संरक्षण करून साध्य होणार नाही. त्यांच्या संपूर्ण स्थलांतर मार्गातील प्रजननस्थळे, विश्रांतीची ठिकाणे आणि हिवाळी अधिवास यांचे परस्पर जोडलेले जाळे सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.