आयआयटी मुंबईचे रूपांतर ‘दुसऱ्या जेएनयू’मध्ये होतेय का?

कॅम्पसमधील डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर जातीय आणि राजकीय ध्रुवीकरणाचे गंभीर आरोप

    22-Sep-2026   
 
IIT Bombay Campus Row
 
मुंबई (IIT Bombay Campus Row) : देशातील अत्यंत प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबई मध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या आंदोलनांमुळे आणि वैचारिक संघर्षांमुळे वाद निर्माण झाला आहे. कॅम्पसमधील काही डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या दुर्घटनांचा, तसेच आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनांचा गैरवापर करून जातीय दरी निर्माण करण्याचा आणि राजकीय अजेंडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप सध्या होताना दिसतो आहे. या घटनांमुळे आयआयटी मुंबईचे रूपांतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाप्रमाणे (जेएनयू) वैचारिक संघर्षाच्या केंद्रात तर होत नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  (IIT Bombay Campus Row)
 
आंदोलनातील प्रमुख चेहरे म्हणून अमरनाथ ठाकूर, हुमा नमाल, आदर्श प्रियदर्शी यांच्याकडे पाहिले जात आहे. आयआयटी मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, अमरनाथ ठाकूर याने एम.ए. नंतर पीएचडी अभ्यासक्रमात (तत्त्वज्ञान विभाग) प्रवेश घेतला. परीक्षा गैरप्रकारांनंतर झालेल्या एका आत्महत्येच्या घटनेला जातीय स्वरूप देऊन विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यापूर्वी २०२३ मध्ये दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतरही तो सक्रिय होता, अशी माहिती आहे. त्याच्या भाषणांमधून हिंदू समाजात जातीय फूट पाडण्याचा, प्रभू श्रीराम आणि हिंदू देवतांना लक्ष्य करण्याचा तसेच ‘जय श्रीराम’च्या जपावरून समाजात चुकीचे कथानक पसरवल्याचा दावा करण्यात आला आहे. (IIT Bombay Campus Row)
 
२०२२ च्या बॅचमधील विद्यार्थिनी हुमा नमाल (पीएचडी विद्यार्थिनी, मानविकी विभाग) कॅम्पसमधील आंदोलनांचे नेतृत्व करताना आणि ‘हमारे इंस्टिट्यूट में जातिवाद होता है’ अशा घोषणा देताना दिसून आली. नमाल ही ‘द कलेक्टिव्ह’ या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी गटाची सक्रिय सदस्य असल्याचे सांगितले जाते. तसेच तिचे संबंध ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ या संघटनेशी अनेकदा आढळून आले आहे. त्याचबरोबर कॅम्पसमधील आंदोलनांमध्ये पुढाकार घेणारा आदर्श प्रियदर्शी (पीएचडी विद्यार्थी, एचएसएस विभाग) याच्यावर गेल्या वर्षी दिल्ली विद्यापीठातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने लैंगिक छळाचे आरोप केले होते. अमरनाथ ठाकूर आणि आदर्श प्रियदर्शी हे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच वैचारिक वर्तुळात सक्रिय असल्याचे ‘लेट्स टॉक तत्त्व’ या यूट्यूब वाहिनीवरील एका जुन्या व्हिडिओवरून समोर आले आहे. (IIT Bombay Campus Row)
 
दर्शन सोळंकीच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईतील 'आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कल (एपीपीएससी) तसेच स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सारख्या संघटनांनी घटनेच्या पहिल्या दिवसापासून आरोप व प्रचार केला होता की, ही आत्महत्या नसून संस्थात्मक खून आहे व जातीय भेदभावामुळे ही घटना घडली. त्यावेळी जशी आंदोलने झाली, तसेच काहीसे स्वरूप साहिल वाकोडे प्रकरणादरम्यान पुन्हा होताना दिसते आहे. (IIT Bombay Campus Row)
 
‘द कलेक्टिव्ह’ आणि नक्षलवादी परिसंस्थेशी संबंधांचा दावा
 
सन २०२१ मध्ये स्थापन झालेल्या ‘द कलेक्टिव्ह’ या समाजवादी विद्यार्थी गटावर भारतविरोधी आणि हिंदूविरोधी प्रचार केल्याचे आरोप झाले आहेत. स्वतःला अतिउजव्या शक्तींविरोधात काम करणारा गट म्हणून ओळखणाऱ्या या संघटनेचे अतिडाव्या आणि नक्षलवादी परिसंस्थेशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा गट सध्याच्या राजकीय वातावरणाला आणि केंद्र सरकारच्या धोरणांना फॅसिस्ट आणि हुकूमशाही म्हणून चित्रित करतो, अशी माहिती आहे. (IIT Bombay Campus Row)
 
‘केवळ माफीने भागणार नाही, राजीनामा हवा’ : सना मलिक, एआयएसए
 
कॅम्पसबाहेर विद्यार्थी संघटना एआयएसए आणि अन्य आंदोलकांकडून सातत्याने निदर्शने सुरू आहेत. विद्यार्थी-विद्यार्थिनी केवळ माफी मागण्यापेक्षा संचालकांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत. मुंबई विद्यापीठात इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेणारी आणि एआयएसएच्या आंदोलनात सहभागी असलेली सना सलीम हिने केवळ सोशल मीडियावर माफी मागून प्रश्न सुटणार नाही, असे म्हटले आहे. “जोपर्यंत आम्हाला ठोस निवेदन मिळत नाही, तोपर्यंत माफीला कोणताही अर्थ नाही. पूर्ण जबाबदारी निश्चित होऊन पारदर्शकता सुनिश्चित होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. आमची सर्वप्रथम मागणी संचालक आणि संबंधित सर्व प्राध्यापकांनी राजीनामा द्यावा, ही आहे.”, असे सना मलिकचे म्हणणे आहे. (IIT Bombay Campus Row)
 
'एसएफआय' कार्यकर्त्यांची हकालपट्टी
 
आंदोलन सुरू असतानाच सोशल मीडियावर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमधील काही व्हिडिओही समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये आयआयटीचे संचालक विद्यार्थ्यांमध्ये बसून त्यांच्या मागण्या ऐकताना आणि त्या मागण्यांच्या मसुद्यावर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. तर कॅम्पसमधूनच समोर आलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये आयआयटीचे विद्यार्थी एसएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांना कॅम्पसबाहेर जाण्यास सांगताना दिसत आहेत. 'एसएफआय कॅम्पस सोडा' यांसारख्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी एसएफआयच्या कार्यकर्त्यांना आंदोलनापासून दूर केले. (IIT Bombay Campus Row)
 
साहिलचा मित्र यतिश कुमारची स्पष्ट भूमिका
 
साहिल वाकोडे याच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये सुरु झालेल्या आंदोलनादरम्यान जातीय भेदभावाचे आरोपही करण्यात आले. मात्र, वाकोडेचा जवळचा मित्र यतिश कुमार याने या घटनेत जातीयवादाची भूमिका असल्याच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केला आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्याने म्हटले की, साहिल वाकोडे यास जातीय भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचे दर्शवणारी कोणतीही बाब त्याने कधीही पाहिली नव्हती. साहिलकडे मोबाइल आढळल्यानंतर त्याला परीक्षा कक्षाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या शिस्तभंग कारवाई समितीने त्याच्यावर कारवाई केलेली नाही, अशी माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर नेमके काय घडले, याची माहिती नसल्याचे कुमारने सांगितले. (IIT Bombay Campus Row)
 
आयआयटी मुंबईतील व्याख्यानांवरून विद्यार्थ्यांचा आक्षेप
 
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी आणि ‘विवेक विचार मंच’च्या काही कार्यकर्त्यांनी प्रा. शर्मिष्ठा साहा यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी नोव्हेंबर २०२३ दरम्यान आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रा. साहा यांनी आपल्या पदाचा वापर करून कट्टर डाव्या विचारसरणीचे अभिनेते-दिग्दर्शक सुधन्वा देशपांडे यांना संस्थेत व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. या व्याख्यानादरम्यान देशपांडे यांनी हमासच्या दहशतवाद्यांचे गौरवीकरण केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप होता. यापूर्वी, नोव्हेंबर २०२३ दरम्यानच आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या एका गटाने लेखक देवदत्त पट्टणायक यांना संस्थेत व्याख्यानासाठी आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. देवदत्त पट्टणायक हे हिंदू धर्मग्रंथांचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप असलेले लेखक म्हणून परिचित आहेत. तसेच सोशल मीडियावर लैंगिकतावादी, स्त्रीद्वेषी आणि अश्लील स्वरूपाची वक्तव्ये केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. (IIT Bombay Campus Row)
 
शिक्षणसंस्थांना जातीय संघर्षाची केंद्रे बनवणे चिंताजनक
 
आयआयटी मुंबई मध्ये साहिल वाकोडे या विद्यार्थ्याची झालेली आत्महत्या ही अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी आहे. परंतु या घटनेनंतर ज्या पद्धतीने या संवेदनशील विषयाचे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते पाहता दुर्दैवाने म्हणावे लागते की, यापूर्वी काही शैक्षणिक संस्थांमध्ये जसे राजकीय अजेंड्याला आणि संघर्षाला प्राधान्य दिले गेले, तशाच प्रकारचे डाव्या विचारसरणीचे अराजकवादी वातावरण आयआयटी सारख्या प्रतिष्ठित शिक्षणसंस्थे मध्ये निर्माण करण्याचे पद्धतशीर प्रयत्न काही घटकांकडून जाणीवपूर्वक सुरू आहेत. साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल झाला असून मुंबई पोलीस क्राइम ब्रांचकडे हा तपास वर्ग करण्यात आला असतानाही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्या ऐवजी अशा दुःखद घटनेचा आधार घेऊन शिक्षणसंस्थांना सातत्याने राजकीय व जातीय संघर्षाची केंद्रे बनवण्याचा प्रयत्न होणे अत्यंत चिंताजनक आहे. आणि ते सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे देखील आहे. (IIT Bombay Campus Row)
 
- अॅड. प्रबोधन निकाळजे
विभाग संयोजक, विवेक विचार मंच महाराष्ट्र राज्य
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर