मुंबई (Ghatkopar Metro Station Inspection) : श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मेट्रो स्थानकांवर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी घाटकोपर मेट्रो स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधत स्थानकातील नागरी सुविधा, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था आणि आपत्कालीन सेवांचा आढावा घेतला. (Ghatkopar Metro Station Inspection)
गणेशोत्सव काळात मुंबईकरांसह भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने प्रवास सुरक्षित, सुकर आणि गतिमान राहावा, यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती महापौरांनी घेतली. स्थानक परिसरात महापालिकेच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांचीही त्यांनी पाहणी केली. (Ghatkopar Metro Station Inspection)
यावेळी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना आणि मेट्रो प्रवासातील अनुभव महापौरांनी जाणून घेतले. प्रवाशांकडून आलेल्या सूचनांची दखल घेऊन आवश्यक त्या सकारात्मक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. (Ghatkopar Metro Station Inspection)
महापौरांनी मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही विविध व्यवस्थापकीय व तांत्रिक विषयांवर चर्चा केली. गणेशोत्सव तसेच गर्दीच्या वेळेत केले जाणारे गर्दी नियंत्रण, मेट्रोचे संचालन, दैनंदिन प्रवासी संख्या, तिकीट दर आणि वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर भविष्यात मेट्रो कोचची संख्या वाढविण्याच्या नियोजनाबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच मेट्रोच्या महसूलवाढीसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेतला. (Ghatkopar Metro Station Inspection)
महापालिका-मेट्रो समन्वयावर भर
महापालिका आणि मेट्रो प्रशासनामध्ये अधिक समन्वय राहण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महापालिकेकडून करण्यात येईल, असे महापौर तावडे यांनी यावेळी सांगितले. या पाहणीदरम्यान मेट्रोचे व्यवसाय प्रमुख अजय कुमार, उपमहाव्यवस्थापक मयंक रावत, वरिष्ठ व्यवस्थापक अल्पेश नागदा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र हांगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. (Ghatkopar Metro Station Inspection)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.