मुंबई (Dahisar Ganpati Mandap Stone Pelting) : दहिसर येथील ओवरीपाडा परिसरात असलेल्या 'अमर सेवा मंडळा'च्या मंडपावर एका धर्मांध मुस्लिमाने हुज्जत घालून दगडफेक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पाणी पिण्याच्या बहाण्याने आलेला शोएब खान या जिहाद्याने गणेशोत्सवानिमित्त उभारलेल्या मंडपावर दगड फेकल्याचे सीसीटिव्ही फुटेजमधून समोर आले. याप्रकरणी शोएब खानविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.(Dahisar Ganpati Mandap Stone Pelting)
मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी 'अमर सेवा मंडळ'च्या मंडपात ६ ते ७ भाविक एकत्र येऊन भजन म्हणत होते. यादरम्यान परिसरातील धर्मांध प्रवृत्तीचा रहिवासी शोएब खान तेथे पाणी पिण्याच्या बहाण्याने आला. मंडळ सदस्य स्वस्तिक पवार हे फोनवर बोलत असताना आरोपी शोएब खान त्यांच्या जवळ गेला आणि "क्या रे, तुम्हारे मंडळ के लोक पाणी भी पिणे नही देते" असे म्हणत वाद घालू लागला. त्यानंतर पवार यांच्या चष्म्यावरून हुज्जत घालत, "तेरा चष्मा बहुत अच्छा है रे, ला दिखा मैं भी फोटो निकालता हु" असे म्हणून त्याने पवार यांच्याशी झटापट केली आणि त्यांचा चष्मा काढून शेजारील पत्र्यावर फेकून दिला.(Dahisar Ganpati Mandap Stone Pelting)
एवढ्यावरच न थांबता शोएबने जवळील दगड हातात घेऊन "तुम साले पाणी पिने नही देते क्या" असे म्हणून मंडपाच्या दिशेने तो भिरकावला. हा दगड मंडपात उपस्थित असलेल्या एका भाविकाच्या पायाला लागला. मंडपातील लोकांनी आरोपीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्याने "आप मुझे जानते नहीं क्या, मै शोएब खान हुँ, मुझसे बचके रहो, वरना सबको मार दूंगा" अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि तेथून पळ काढला.(Dahisar Ganpati Mandap Stone Pelting)
गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात भजनाच्या कार्यक्रमात व्यत्यय आणणे, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणे आणि धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धमकी दिल्याप्रकरणी तक्रारदार स्वस्तिक पवार आणि मंडळाचे अध्यक्ष अर्जुन यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात आरोपी शोएब खानविरुद्ध तक्रार नोंदवली. भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम २९९, ३००, १२५(अ), ३५२, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (Dahisar Ganpati Mandap Stone Pelting)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक