
मुंबई - Vijay Andalka Star Pravah गणेशोत्सव म्हटलं की घराघरात उत्साह, आनंद आणि भक्तीचं वातावरण पाहायला मिळतं. ढोल-ताशांचा गजर, बाप्पांच्या आगमनाची लगबग आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय होऊन जातो. प्रत्येक कुटुंबासाठी बाप्पांचं आगमन ही आनंदाची आणि भावनिक क्षणांची पर्वणी असते. अशाच भक्तिमय वातावरणात अभिनेता विजय आंदळकरच्या घरी यंदाही गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे.
गणेशोत्सवाच्या आठवणी सांगताना विजय म्हणाला, ‘१९७४ पासून माझ्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. यंदा या परंपरेला तब्बल ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही परंपरा माझ्या वडिलांनी सुरू केली. आज ते या जगात नाहीत, मात्र त्यांनी सुरू केलेली ही परंपरा आम्ही आजही तितक्याच श्रद्धेने आणि भक्तिभावाने पुढे नेत आहोत. दरवर्षी आमच्या घरी दहा दिवस गणपती बाप्पा विराजमान होतात. बाप्पांच्या आगमनाने घरात आनंदाचं आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते.Vijay Andalka Star Pravah
माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही परंपरा आता आमच्यासाठी केवळ एक धार्मिक उत्सव राहिलेली नाही, तर त्यांच्या आठवणी आणि संस्कार जपणारा एक भावनिक वारसा आहे. वडिलांनीलावलेली ही भक्तीची ज्योत ५२ वर्षांनंतरही अखंड तेवत ठेवणं हीच आमच्यासाठी त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचं विजयने सांगितलं.Vijay Andalka Star Pravah