
मुंबई -Sharvari sooraj barjatyaशर्वरीने आपल्या आगामी 'ये प्रेम मोल लिया' या चित्रपटाच्या संगीत अनावरणाचा खास सोहळा मुंबईतील प्रतिष्ठित रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये साजरा केला. पिढ्यान्पिढ्या कुटुंबांसोबत कथा, गाणी आणि चित्रपटांना जिवंत होताना पाहण्याचा अनुभव देणाऱ्या या ऐतिहासिक स्थळाला शर्वरीने चित्रपटाच्या प्रमोशनच्या सुरुवातीसाठी अत्यंत खास आणि योग्य ठिकाण म्हटले.
संगीत अनावरणाचे काही खास क्षण तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत या ठिकाणाचे आणि या प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित केले. तिने लिहिले, “रॉयल ऑपेरा हाऊस, जिथे पिढ्यान्पिढ्या कुटुंबं एकत्र येऊन कथा, गाणी आणि चित्रपटांना जिवंत होताना पाहत आली आहेत. सूरज बडजात्यांच्या ‘ये प्रेम मोल लिया’च्या प्रमोशनची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर जागा कोणती असू शकते!Sharvari sooraj barjatya
'ये प्रेम मोल लिया' हा शर्वरीचा सूरज बडजात्या आणि आयुष्मान खुराना यांच्यासोबतचा पहिला चित्रपट असल्याने हा प्रसंग तिच्यासाठी आणखी खास ठरला. भावना, कुटुंब आणि संगीत याभोवती गुंफलेल्या या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चसाठी ऐतिहासिक रॉयल ऑपेरा हाऊस हे अगदी योग्य ठिकाण ठरले. हा खास क्षण “आपल्या हृदयाच्या अगदी जवळ जपून ठेवणार असल्याचे” शर्वरीने म्हटले.Sharvari sooraj barjatya
सूरज बडजात्या दिग्दर्शित आणि आयुष्मान खुराना व शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'ये प्रेम मोल लिया' हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.Sharvari sooraj barjatya