मुलुंडमध्ये ट्रॅव्हल्स-'बेस्ट' बसची धडक; वाहकाच्या तत्परतेने आग विझली, चालक जखमी

    21-Sep-2026

Mulund BEST Bus Accident
 
मुंबई (Mulund BEST Bus Accident): मुलुंड येथील रेली वूल्फ परिसरात रविवारी सकाळी ५:५० च्या सुमारास 'बेस्ट' बस आणि खाजगी ट्रॅव्हल्समध्ये समोरासमोर धडक झाली. मेट्रोच्या कामामुळे लागू असलेल्या एकेरी मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने सीप्झकडून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या मजास आगाराच्या ४९६ क्रमांकाच्या बेस्ट बसला जोरदार धडक दिली.(Mulund BEST Bus Accident)
 
​या अपघातात बेस्ट चालक संदीप नामदेव कारंडे (वय ४०) जखमी झाले. धडकेमुळे बसच्या बोनेटमध्ये आग लागली; मात्र वाहकाने अग्निरोधक उपकरणाचा वापर करून तत्परतेने आग पूर्णपणे विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. जखमी चालकाला मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात प्रथमोपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. टोइंग व्हॅनच्या साहाय्याने बस मुलुंड आगारात हलवण्यात आली असून, या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.(Mulund BEST Bus Accident)
 
 




संबंधित मजकूर