मैत्रीच्या पलीकडच्या भावनांचा गुंता 'मैत्रेया'!

    21-Sep-2026

maitreya
 
 
मुंबई - Kranti Redkarकाही नाती शब्दांत सांगता येत नाहीत, तर काही नात्यांना नाव देणंही कठीण असतं. अशाच एका नात्याची उत्सुकता वाढवणाऱ्या ‘मैत्रेया’ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या आयुष्यातील नात्यांचा वेगळाच पैलू टीझरमधून समोर येतो. एकमेकांसोबतची मैत्री, सहजपणा, मस्ती आणि एकमेकांच्या आयुष्यात असलेली जागा दिसत असतानाच, त्यांच्या नात्यांमध्ये दडलेल्या भावनांचा गुंता नेमका काय आहे, हा प्रश्न टीझरमधून निर्माण होतो.
टीझरमध्ये आर्जोयी, जय, साजिरी आणि निर्वाण यांच्यातील नातं दिसतं. ते एकमेकांच्या आयुष्यातील खास व्यक्ती बनलेले आहेत. मात्र, आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती आली की, आतापर्यंत आपली वाटणारी व्यक्तीही अचानक परकी किंवा अनोळखी वाटू लागते. याच भावनेभोवती या चौघांच्या नात्यांचा गुंता उलगडताना दिसतो. एकमेकांसोबतचे सहज क्षण, जवळीक आणि बदलत जाणारी नाती पाहाता, मैत्रीच्या या नात्यात नेमकं काय दडलं आहे, याची उत्सुकता निर्माण होते.Kranti Redkar
लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणतात, “टीझरच्या शेवटी ‘एकीकडे प्रेम, एकीकडे मैत्री अन् एकीकडे मैत्रीत गोंधळलेलं प्रेम…’ हे वाक्य या नात्यांच्या गुंत्यात आणखी भर घालतं. या एका वाक्यातून आर्जोयी, जय, साजिरी आणि निर्वाण यांच्या नात्यांमधील पेच समोर येतो. प्रेम कुठे संपतं आणि मैत्री कुठून सुरू होते, की काही नाती या दोन्हींच्या मध्येच कायम राहातात, याचा शोध ‘मैत्रेया’च्या कथेतून घेतला जाणार आहे.’’Kranti Redkar
निर्माते मनोज खळतकर म्हणतात, “मला काहीतरी युथफुल करण्याची आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहाता येईल असा फॅमिली एंटरटेनर प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची इच्छा होती. ‘मैत्रेया’च्या माध्यमातून ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाईच्या नात्यांमधील भावभावना, त्यातील गंमत आणि सहजपणा यांचा अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटातून घेता येईल.”Kranti Redkar
समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित आणि क्रांती रेडकर वानखेडे लिखित-दिग्दर्शित ‘मैत्रेया’ या चित्रपटाची निर्मिती मनोज खळतकर यांनी केली असून या चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमन खळतकर या चित्रपटाचे सह निर्माते आहेत. येत्या २३ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.Kranti Redkar
 




संबंधित मजकूर