अभिनेता अशोक शिंदेंनी सांगितल्या गणपतीच्या आठवणी !

    21-Sep-2026
 
ashok
 
 
 
मुंबई - Ashok Shindeगणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि प्रत्येकाच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. बाप्पाला घराची आरास, मोदकांचा गोडवा, आरती-भजनांचा आनंद आणि कुटुंबीयांसोबत घालवलेले क्षण यामुळे हा सण प्रत्येकासाठी खास असतो. प्रत्येक घरात गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी असली, तरी बाप्पाशी जोडलेली भावना मात्र तितकीच जिव्हाळ्याची असते. स्टार प्रवाहवरील 'आमच्या सुना येती घरा' मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणाऱ्या अशोक शिंदे यांनीही यावेळी आपल्या गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला.
अशोक शिंदे यावेळी म्हणाले, मी मुळचा पुण्याचा. कामानिमित्ताने मुंबईत शिफ्ट झालो. पण आमच्या घरी बाप्पाच्या आगमनाची खूप अविस्मरणीय आठवण आहे. लहान असताना शाळेतून येता जाताना मी गणपती बनवताना पाहायचो. एकदा कुतूहल म्हणून एका दुकानात थांबलो आणि मूर्तिकाराकडून बाप्पा कसा बनवायचा याची माहिती घेतली. घरी येऊन शाडूच्या मातीचा बाप्पा बनवला. आई बाबांना खूप आवडला. बाबा म्हणाले इतकी सुंदर मूर्ती बनवली आहेस. साक्षात बाप्पा घरी आलेत तर आपण त्यांची प्राणप्रतिष्ठापना करू. ती परंपरा गेली 40 वर्ष अखंड सुरु आहे. सुरुवातीला मी स्वतः बाप्पाची मूर्ती बनवायचो. कामाचा व्याप वाढत गेला मग मूर्ती आम्ही बनवून घायला लागलो. बाप्पाच्या सेवेची संधी मिळणं या पेक्षा मोठं सुख काय आहे. माझी आई प्रसादासाठी पंछखाद्य बनवायची. आई गेल्यानंतर माझ्या बायकोने ही परंपरा पुढे नेली. माझ्या दोन्ही मुली देखील बाप्पाची मनोभावे सेवा करतात. स्टार प्रवाहवरील आमच्या सुना येती घरा मालिकेच्या सेटवरही बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे सेटवरही चैतन्याचं वातावरण असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.Ashok Shinde
 




संबंधित मजकूर