शिवलिंगासह मंदिरातील मूर्तींची तोडफोड!

उदयपूरमध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

    21-Sep-2026   

Udaipur Temple Vandalism
मुंबई (Udaipur Temple Vandalism) : राजस्थानातील उदयपूरच्या सूरजपोल पोलीस ठाणे परिसरात स्थानिक हिंदू मंदिराची तोडफोड केल्याच्या घटनेवरून शनिवारी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. स्थानिकांनी बाजारपेठ बंद ठेवत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी फिरोज उर्फ भुरिया नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंदिराची तोडफोड झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. (Udaipur Temple Vandalism)
या व्हिडीओमध्ये मंदिरातील शिवलिंगासह अन्य मूर्तींची तोडफोड झाल्याचे दिसत होते. संतप्त स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी प्राथमिक तपास करत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात येत आहे. (Udaipur Temple Vandalism)
या घटनेच्या निषेधार्थ संतप्त स्थानिकांनी शनिवारी आंदोलन केले आणि दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शहरातील देहलीगेट चौक परिसरातील स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांनीही आपली दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवून प्रशासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. काही तास आंदोलन केल्यानंतर स्थानिकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गौरव अग्रवाल यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच त्याच्या बेकायदा मालमत्तांवर बुलडोझर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या आवाहनानंतर आणि या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (Udaipur Temple Vandalism)
स्थानिक भाजप नेते सनी पोखरणा यांनी या घटनेचा निषेध करत हिंदू मंदिरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मंदिराची दुरुस्ती करण्याबरोबरच आरोपीच्या बेकायदा मालमत्तांवर बुलडोझर कारवाई करण्याच्या स्थानिकांच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दर्शविला. (Udaipur Temple Vandalism)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर