अमरावती (Chandrashekhar Bawankule Amravati) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार यांना आपापल्या भागात दुष्काळाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि तळेगाव-ठाकूर येथे अपुऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. (Chandrashekhar Bawankule Amravati)
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "अमरावती जिल्ह्यात ३९ दिवस पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनचे पीक वाया असून याबाबत सर्वेक्षण सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन यातून मार्ग निघत नाही. ही नैसर्गिक आपत्ती असून अशावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे प्राधान्यक्रमावर आहे. एखादी विकासाची योजना कमी झाली तर चालेल पण शेतकऱ्याला आत्महत्येकडे जाऊ देऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. लवकरच सर्वेक्षणाचे अहवाल येतील. याच अहवालाच्या आधारावर आपण २०१७ आणि २०१८ मध्ये निर्णय केले आहेत. यावर्षीही तसेच निर्णय करण्याची गरज आहे. आता सर्वेक्षणाला सुरुवात केली असून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. आज पाऊस फार चिंतेचा विषय असून परतीचा पाऊस चांगला आल्यास तूर पीक वाचेल." (Chandrashekhar Bawankule Amravati)
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसा १२ तास वीज देण्याच्या सूचना दिल्या असून या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न आहे. खराब झालेले सोलर पंप पुन्हा सुरु करणे आणि बिघडलेले ट्रान्सफॉर्मर सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत," असेही त्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule Amravati)
समोर काजू, बदाम ठेवल्यास मंत्र्यांचा काय दोष?
नांदेडमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत चक्क मंत्री आणि आमदारांसाठी काजू, बदाम ठेवण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "समोर काजू, बदाम ठेवले यात मंत्र्यांचा काय दोष? जिल्हाधिकारी कार्यालयात कुणी काजू, बदामच्या प्लेट आणून ठेवल्या असल्यास त्यात मंत्र्यांची काय चूक आहे. प्रत्येक भागाचा दौरा करून तिथली विदारक परिस्थिती कॅबिनेटमध्ये मांडणे ही आमची जबाबदारी आहे. सर्व मंत्र्यांनी आपापल्या भागांचे दौरे करून राज्याचे वास्तव सरकारसमोर मांडले पाहिजे. त्यातून निर्णय होतात. त्यामुळे मंत्री काजू, बदाम खात आहेत, असे नरेटिव्ह करणे बरोबर नाही. आमचे सरकार संवेदनशील आहे. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करून शेतकऱ्यांना काय काय मदत देता येईल, यावर सरकार काम करेल." (chandrashekhar bawankule amravati)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....