मुंबई - (Preity Zinta Kunal Khemu)अॅमेझॉन MGM स्टुडिओजने आज आपल्या आगामी थिएट्रिकल फिल्म ‘वाइब’चा ट्रेलर रिलीज केला आहे. कुणाल खेमू यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या हाय-स्टेक्स अॅक्शन-कॉमेडीची कथा दोन जिवलग मित्रांभोवती फिरते. त्यांचे साधेसुधे आयुष्य अचानक एका अनोळखी आणि धोकादायक साहसात बदलते. या प्रवासात त्यांच्या सर्व्हायव्हल स्किल्ससोबतच त्यांच्या मैत्रीचीही कसोटी लागते. कुणाल खेमू आणि चिराग निहलानी यांनी ड्रोंगो फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती केलेल्या या चित्रपटात हाय-स्टेक्स अॅक्शन, व्यक्तिरेखांवर आधारित विनोद, एनर्जेटिक म्युझिक आणि स्वतःची एक वेगळी वाइब असलेली शानदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात कुणाल खेमूसोबत प्रीती झिंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि वंशिका धीर प्रमुख भूमिकेत आहेत, तर यशपाल शर्मा आणि दिनेश लाल यादव महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
ट्रेलरमध्ये प्रेक्षकांची भेट कुणाल खेमूने साकारलेल्या हार्दिक आणि स्पर्श श्रीवास्तवच्या बग्स या व्यक्तिरेखेशी होते. हे दोघे मित्र आपले साधेसुधे आयुष्य जगत असतात. मात्र, जेव्हा देशासमोर एक मोठा धोका उभा राहतो, तेव्हा त्यांना अचानक हिरो बनण्यास भाग पाडले जाते. या मिशनसाठी दोघेही अजिबात तयार नसतात आणि आपण कोणत्या संकटात अडकणार आहोत, याची त्यांना कल्पनाही नसते. प्रीती झिंटाची ‘मॅडम एच’ ही व्यक्तिरेखा, जी तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील अगदी वेगळ्या अॅक्शन-कॉमेडी अवतारात दिसत आहे, या दोघांना एका हाय-स्टेक्स मिशनवर पाठवते. मजेदार पंचलाईन्स, बेधडक ह्युमर आणि दोन मित्रांमधील धमाल नोकझोक यांनी भरलेला हा ट्रेलर हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्स, एनर्जेटिक आणि पेपी म्युझिक तसेच अनेक ट्विस्ट्सनेही परिपूर्ण आहे, जे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर सतत हसू आणि मनात रोमांच कायम ठेवतात. (Preity Zinta Kunal Khemu)
लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता कुणाल खेमू म्हणाला , “‘वाइब’च्या माध्यमातून मला असा बिनधास्त एंटरटेनर बनवायचा होता, जो प्रेक्षक कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा अगदी एकट्यानेही थिएटरमध्ये जाऊन पाहू शकतील आणि मनापासून एन्जॉय करू शकतील. यात मला चित्रपटांमध्ये आवडणाऱ्या जवळपास प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे—मनमुराद हसवणारी कॉमेडी, हाय-ऑक्टेन अॅक्शन, गोड रोमॅन्स, धमाकेदार म्युझिक आणि बरंच काही. माझ्यासाठी कॉमेडी ही अशा परिस्थितीतून निर्माण होते, जेव्हा सामान्य माणसं अचानक अशा गोंधळात अडकतात, जो पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाबाहेर असतो. (Preity Zinta Kunal Khemu)
अशाच एका व्यक्तिरेखेची भूमिका साकारण्यासोबतच चित्रपट लिहिणे, दिग्दर्शित करणे आणि प्रोड्यूस करणे हा माझ्यासाठी एकाच वेळी या वेड्या दुनियेच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये सतत स्विच करण्यासारखा अनुभव होता. प्रीती, स्पर्श, वंशिका, यशपाल, दिनेश आणि संपूर्ण कास्टने आपल्या-आपल्या व्यक्तिरेखांमध्ये काहीतरी वेगळं आणि खास आणलं. त्यामुळे चित्रपट पुढे जात असताना त्याची केमिस्ट्री आणखी मजेदार होत गेली. चित्रपटात चेस, धोका, गोंधळ, मैत्री आणि अनेक चुकीचे निर्णय आहेत—आणि कदाचित हेच ‘वाइब’ बनवताना मला इतकी मजा का आली, याचं अगदी योग्य उदाहरण आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी अॅमेझॉन MGM स्टुडिओजसारखा परफेक्ट पार्टनर मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि आता ‘वाइब’ मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना दाखवण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. (Preity Zinta Kunal Khemu)
प्रीती झिंटाने आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले, “माझ्या व्यक्तिरेखेची सर्वात चांगली गोष्ट मला तिची स्वतःची एक वेगळी एनर्जी वाटली. ती आपल्या देशावर खूप प्रेम करते आणि त्याच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. एखादे काम पूर्ण करायचे असेल, तर ते पूर्ण करण्याचा कोणता ना कोणता मार्ग ती शोधून काढते—मग तो योग्य मार्ग असो किंवा चुकीचा, जे काही करावे लागेल ते ती करते. अशी ठाम विचारसरणी असलेल्या महिलेची भूमिका साकारताना मला खूप आनंद झाला आणि या भूमिकेमुळे माझ्यातील असा एक पैलू प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी मिळाली, जो त्यांनी याआधी पाहिलेला नाही. आपल्या कलाकारांकडून नेमके काय हवे आहे, हे कुणालला चांगलेच माहीत आहे आणि या वेड्यावाकड्या चित्रपटावर काम करणे एखाद्या साहसापेक्षा कमी नव्हते. पुढच्या दिवशी काय होणार आहे, याची तुम्हाला कधीच कल्पना नसायची आणि ‘वाइब’ नावाच्या चित्रपटासाठी हे अगदी योग्यही वाटत होते. (Preity Zinta Kunal Khemu)