मुंबई: (Madhuri Pawar )मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपला अभिनय तसेच नृत्याने प्रेक्षकांचे मन जिंकणारी, 'रान बाजार' या वेब सिरीजमधून आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार सोशल मीडियावरील ऑनलाईन ट्रोलिंग आणि आक्षेपार्ह कमेंट्समुळे चांगलीच चिडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या घाणेरड्या कमेंट्स, अश्लील शेरेबाजी विरोधात तसेच सातत्याने मिळणाऱ्या धमक्याना वैतागून माधुरीनं अखेर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी कठोर कारवाईसाठी तिने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायासाठी दाद मागितली आहे..
माधुरी पवारनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे..एका महिला कलाकाराबद्दल वाचतानाही लाज वाटेल अशा भाषेत टिपण्या केल्या जात असून, यामुळं प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं माधुरीनं व्हिडिओत म्हंटलं आहे..(Madhuri Pawar )
गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर माझ्याबद्दल चुकीच्या आणि अपमानास्पद कमेंट्स करून मला सतत टार्गेट केलं जात आहे. माझी बदनामी करण्याचे प्रयत्न होत आहेत. माझं विकीपिडिया पेज देखील डिलीट करण्यात आलं आहे, आणि माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सना हॅक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मला जाणवत आहे.(Madhuri Pawar )
एक मुलगी म्हणून ही परिस्थिती माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक आणि भीतीदायक आहे. मी कोणाचंही नुकसान करू इच्छित नाही; मला फक्त सत्य समोर यावं, माझी प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपली जावी आणि या प्रकारामागे कोण आहे याची योग्य चौकशी व्हावी, एवढीच अपेक्षा आहे.(Madhuri Pawar )
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय सुनेत्रा पवार, आपण माझ्यासारख्या एका कलाकाराची व्यथा समजून घेऊन मला योग्य ती मदत आणि संरक्षण मिळवून द्यावं, ही मनापासून विनंती, असं माधुरीने व्हिडिओत म्हंटलं आहे..या वाढत्या सायबर गुन्हेगारीची आणि कलाकारांच्या सुरक्षेची गांभीर्यानं दखल घ्यावी, यासाठी माधुरी पवारनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे विनंती केली आहे.(Madhuri Pawar )