मुंबई (Hyderabad Voter List SIR) : भाग्यनगर (हैदराबाद) येथील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या एसआयआर सर्वेक्षणाअंतर्गत सुमारे १९.४१ लाख मतदारांची नावे वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहेत, असा दावा सबार इन्स्टिट्यूट आणि कॉन्स्टिट्यूशनल गार्डियन्स फोरम यांच्या प्राथमिक विश्लेषणात करण्यात आला आहे. प्रकाशित करण्यात आलेल्या यादींच्या विश्लेषणानुसार, ४०९४ मतदान केंद्रांमध्ये एकूण १९,४१,४४४ मतदारांची नावे वगळण्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. हा आकडा जानेवारी २०२३ मधील मतदार यादीच्या तुलनेत ४६.१ टक्के इतका आहे.(Hyderabad Voter List SIR)
अहवालानुसार, या प्रमाणातील वगळणी ही केवळ निवडणूक आकडेमोडीचा विषय नसून राजकीय सहभागाचा अधिकार, शासकीय संस्थांपर्यंत पोहोच, प्रक्रियात्मक न्याय आणि कागदपत्रे किंवा स्थलांतराच्या अडचणी असलेल्या नागरिकांवरील असमान भार या व्यापक प्रश्नांशी संबंधित आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की मतदार यादीतून नाव वगळल्याने एखाद्याचे नागरिकत्व किंवा सरकारी सेवांचा कायदेशीर हक्क आपोआप रद्द होत नाही. मात्र, मतदार ओळखपत्र आणि मतदार नोंद अनेक प्रशासकीय व्यवहारांमध्ये उपयोगी पडत असल्याने अशा व्यक्तींना अतिरिक्त प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागू शकते.(Hyderabad Voter List SIR)
अहवालानुसार, हैदराबादमधील सर्व १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये एएसडी अंतर्गत वगळण्यात येणाऱ्या मतदारांची संख्या २०२३ च्या विजयी मतांच्या फरकापेक्षा जास्त आहे. काही मतदारसंघांमध्ये वगळणीची संख्या २०२३ मध्ये पडलेल्या एकूण मतांच्या जवळपास किंवा त्याहून अधिक आहे. मलकपेटमध्ये १,४७,७९९ मतदारांची नावे वगळण्याच्या यादीत आहेत, तर २०२३ मध्ये तेथे एकूण १,३२,०२४ मते पडली होती. याकूतपुरा मध्ये १,५४,९८२ नावे वगळण्याच्या यादीत असून २०२३ मध्ये तेथे १,४०,४३४ मते पडली होती. संपूर्ण हैदराबादमध्ये वगळण्यात येणाऱ्या मतदारांची संख्या २०२३ विधानसभा निवडणुकीत पडलेल्या एकूण मतांच्या सुमारे ८९ टक्के इतकी आहे. अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की याचा अर्थ असा नाही की हे सर्व मतदार मतदान केले असते किंवा या वगळणीमुळे एखाद्या मतदारसंघाचा निकाल बदलला असता. मात्र, मागील निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारसंख्येच्या तुलनेत ही प्रक्रिया किती व्यापक आहे, हे यातून स्पष्ट होते.(Hyderabad Voter List SIR)
अहवालाच्या शेवटी म्हटले आहे की अचूक मतदार यादी राखणे आवश्यक आहे; मात्र ती अचूकता पारदर्शकता, जबाबदारी, सुलभ अपील, कायदेशीर मदत आणि चुकीच्या वगळणीपासून संरक्षण या तत्त्वांसोबतच असली पाहिजे. याशिवाय, देशभरात झालेल्या एसआयआर प्रक्रियेचे स्वतंत्रपणे परीक्षण करून वगळणी, मृत्यूव्यतिरिक्त इतर कारणांवरील वगळणी, पुनर्स्थापना, अपील, प्रलंबित प्रकरणे, लोकसंख्याशास्त्रीय नमुने, कागदपत्रांच्या अटी, अल्गोरिदमचा वापर आणि सामाजिक-आर्थिक परिणाम यांचा सर्वंकष अभ्यास करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.(Hyderabad Voter List SIR)
वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आलेल्या १९.४१ लाख मतदारांपैकी
१३,४५,३३३ - कायमस्वरूपी स्थलांतरित (६९.३%)
३,४०,४५५ - सापडले नाहीत/अनुपस्थित (१७.५%)
९९,२६४ - इतरत्र आधीच नोंदणीकृत
१,५६,३९२ - मृत
वगळण्यात आलेल्यांमध्ये ४०.७ टक्के मुस्लिम मतदार
विश्लेषणानुसार, वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आलेल्या मतदारांपैकी:
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक