अन्नात भेसळ कराल तर याद राखा! तुकाराम मुंढेंच्या कामाला प्रोत्साहन देणारा देखावा पाहिलात का?

नवी मुंबईतील सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या देखाव्य़ाची सोशल मीडियावर चर्चा

    19-Sep-2026

 

 Tukaram Mundhe Food Adulteration Campaign 
(image by- FreePressJournal) 
 

नवी मुंबई (Tukaram Mundhe Food Safety Campaign) : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील धडाकेबाज कारवाईबद्दलचा देखावा ऐरोलीतील ‘सिद्धिविनायक गणेश मंडळा’ने साकारला आहे. यामध्ये मंडळाने भित्तीफलकांच्या आधारे मुंढेंच्या कार्याची माहिती देत अन्नसुरक्षेबद्दल जनजागृती केली. (Tukaram Mundhe Food Safety Campaign)

नवी मुंबईतील सिद्धिविनायक गणेश मंडळाने आपल्या कलेला एका आगळ्या वेगळ्या विषयाची जोड देऊन आपल्या देखाव्यातुन अन्नसुरक्षेच्या गंभीर विषयावर प्रकाश टाकत जनकल्याणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे तुकाराम मुंढे यांच्या कार्याची जनजागृती केली आहे. (Tukaram Mundhe Food Safety Campaign)

 

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कारभार सांभाळणारे तुकाराम मुंढे यांच्या कार्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली असताना ‘सिद्धिविनायक गणेश मंडळ’, सेक्टर 03, ऐरोली येथे साकारलेला पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या देखाव्याच्या माध्यमातून मंडळाने केवळ तुकाराम मुंढे यांच्या कार्याचा गौरव केला नाही, तर नागरिकांनीही अन्नपदार्थ भेसळीविरोधात जागरूक राहून सतर्कता बाळगावी, असा मोलाचा संदेश दिला आहे. (Tukaram Mundhe Food Safety Campaign)

 




संबंधित मजकूर