
मुंबई - Shivani Sonar Zee Marathi Modak गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि प्रत्येकाच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. बाप्पाला घराची आरास, मोदकांचा गोडवा, आरती-भजनांचा आनंद आणि कुटुंबीयांसोबत घालवलेले क्षण यामुळे हा सण प्रत्येकासाठी खास असतो. प्रत्येक घरात गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी असली, तरी बाप्पाशी जोडलेली भावना मात्र तितकीच जिव्हाळ्याची असते. 'झी मराठी'वरील ‘तारिणी’ तारिणी अर्थात शिवानी सोनारने पण गणेशोत्सवाच्या परंपरा, बाप्पाशी जोडलेल्या आठवणी आणि या सणाविषयीच्या भावना सांगितल्या आहेत.
पुण्यात वाढलेल्या शिवानी सोनारसाठी गणेशोत्सव हा सर्वात आवडता सण असून, माहेर आणि सासर अशा दोन्ही घरांतील गणपतीशी तिच्या खास आठवणी जोडलेल्या आहेत. बाप्पाची मूर्ती निवडण्याची परंपरा, पुण्यातील मानाच्या गणपतींचं दर्शन आणि यंदा सासूबाईंकडून उकडीचे मोदक शिकण्याची इच्छा तिने व्यक्त केली. Shivani Sonar Zee Marathi Modak
शिवानी म्हणाली, “माझ्या माहेरी आणि सासरी अशा दोन्ही ठिकाणी गणपती असतो. माहेरी १० दिवसांचा आणि सासरी दीड दिवसांचा गणपती असतो. गणेशोत्सव हा माझ्या सर्व सणांमधला अतिशय लाडका आणि आवडता सण आहे. मी पुण्याची असल्यामुळे मी एक नियम केला आहे की, मानाच्या पाच गणपतींचं दर्शन नक्की घ्यायचं. जसा वेळ मिळेल तसं मी जाते आणि पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेतेच. बाप्पासाठी आरास आणि डेकोरेशन करायला मला पूर्वीपासूनच आवडतं. पण सध्या शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. मात्र कोणाला काही आयडिया देणं किंवा ऑनलाइन शॉपिंग करणं, हे माझं काम सुरूच असतं. माझ्या माहेरी आमच्या बाप्पाची मूर्ती कायम मीच निवडते. आता ती एक परंपराच झाली आहे आणि माझ्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे. गणपतीच्या काळात मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा मी माझ्या आजूबाजूच्या परिसरात गणपतीच्या मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांचे स्टॉल्स आवर्जून पाहते. वेगवेगळ्या मूर्तीकारांच्या स्टॉलवर जाऊन मूर्ती बघायला मला फार आवडतं. प्रत्येक मूर्ती वेगळी असते. बाप्पाचे हावभाव, त्यांची ठेवण, रूपरंग सगळं निरखायला आपल्याला प्रचंड आवडत असल्याचं शिवणीने सांगितलं. Shivani Sonar Zee Marathi Modak
शिवानी पुढे म्हणाली कि, दरवर्षी मी मोदक करतेच; पण यावर्षी सुबक-सुरेख उकडीचे मोदक करायचं मी ठरवलं आहे. तळणीचे मोदक मला जमतात, पण उकडीचे मोदक अजूनही मला फारसे चांगले जमत नाहीत. ते मला शिकायचे आहेत आणि यावर्षी मी माझ्या सासूबाईंकडून ते शिकून घेणार आहे.”बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना मुलीचा उत्साह पाहण्यापासून ते गावच्या भजनाच्या मैफलीपर्यंत, संकटातून मार्ग मिळाल्याची आठवण असो किंवा घरच्या बाप्पाची मूर्ती निवडण्याची परंपरा प्रत्येक कलाकाराच्या गणेशोत्सवाच्या आठवणी वेगळ्या आहेत. मात्र या सगळ्या आठवणींमध्ये कुटुंब, परंपरा, आनंद आणि बाप्पावरील श्रद्धा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. यंदाचा गणेशोत्सवही अशाच आनंददायी क्षणांनी आणि बाप्पाच्या आशीर्वादाने भरलेला असावा, अशी इच्छा यावेळी शिवानीने व्यक्त केलीये.Shivani Sonar Zee Marathi Modak