पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोग्यासाठी कौपिनेश्वर मंदिरात `आशीर्वादाचा दिवा'!

आशीर्वादाचा दिवा" कार्यक्रमांतर्गत प्रज्वलित केले ५५१ दिवे

    19-Sep-2026

 PM Modi Birthday Aashirwadacha Diva Thane
 
ठाणे (PM Modi Birthday Aashirwadacha Diva Thane ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरात `आशीर्वादाचा दिवा' कार्यक्रमांतर्गत प्रज्वलित केलेल्या ५५१ दिव्याने सेवाभावाचा संकल्प दृढ करीत नरेंद्र मोदींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. भाजप नौपाडा मंडल, नगरसेविका नम्रता कोळी आणि भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या वतीने या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. ( PM Modi Birthday Aashirwadacha Diva Thane)
 
देशाचे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्याबरोबरच प्रसन्न वातावरणात कौपिनेश्वराची आराधना करण्यात आली. भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार माधवी संजय नाईक, जिल्हाध्यक्ष संदिप लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या दिव्याच्या प्रकाशात सुशासन, गरीब कल्याण, सर्वसामान्यांचा सन्मान आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर राष्ट्रसेवेची ऊर्जा लाभो, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहचवण्यासाठी गणरायाच्या कृपेने मोदीजींना शतायुषी आयुष्य लाभो, असे साकडे घालण्यात आले. (PM Modi Birthday Aashirwadacha Diva Thane )
 
या वेळी नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, उषा वाघ, नगरसेवक सुनेश जोशी, विकास पाटील, विलास साठे, आध्यात्मिक सेल अध्यक्षा अश्विनी पटवर्धन, सागर भदे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अमित शेलार, नौपाडा मंडल सरचिटणीस प्रतीक सोलंकी, समीर साठे, विजेंद्र चटोले, अन्वेष जयगडकर, मीनाक्षी मिस्त्री, अरुणा कांबळे, सुनीता भोईर, निकत सारंग, सिद्धी मिस्त्री आणि राजू ढमाले यांनी मेहनत घेतली. (PM Modi Birthday Aashirwadacha Diva Thane )
 
`




संबंधित मजकूर