
मुंबई -Hruta Durgule ‘मला मोठं व्हायचंय’ म्हणत गणपती बाप्पाकडे इच्छा व्यक्त करणाऱ्या एका चिमुकलीची गोष्ट ‘आली मोठी शहाणी’च्या टीझरमधून समोर आली होती. टीझरमधील या निरागस इच्छेने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले असतानाच आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये या चिमुकलीच्या इच्छेभोवती रंगणारी मजेशीर गोष्ट आणि त्यातून निर्माण होणाऱ्या काही गंमतीदार प्रसंगांची झलक पाहायला मिळते. तिची ही इच्छा पुढे नेमकं काय रूप घेते, याचा अंदाज देत ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता कायम ठेवली आहे.
या कथेत हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या व्यक्तिरेखाही महत्त्वाच्या ठरतात. हृता आणि सारंग पहिल्यांदाच एकत्र दिसत असल्याने त्यांच्या जोडीची उत्सुकता आधीपासूनच होती. ट्रेलरमध्ये हृता साकारत असलेल्या व्यक्तिरेखेची झलक लक्ष वेधून घेते, तर सारंगची व्यक्तिरेखा या कथेत नेमकी कोणती भूमिका बजावते, याचा अंदाज बांधण्याची संधी मिळते. या दोघांचा चिमुकलीच्या आयुष्याशी नेमका काय संबंध आहे, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच समोर येणार आहे. त्यामुळे हृता-सारंगची जोडी आणि चिमुकलीच्या विश्वाची सांगड पडद्यावर कशी घातली आहे, हे पाहाणं रंजक ठरणार आहे.Hruta Durgule
लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “‘आली मोठी शहाणी’ची कथा एका अतिशय साध्या इच्छेतून सुरू होते. मात्र त्या इच्छेभोवती गोष्ट जशी पुढे उलगडत जाते, तसतसे त्यातील वेगवेगळे पैलू समोर येतात. मुलांच्या मनात असणारे विचार आणि त्यांच्या छोट्या छोट्या इच्छा यातून अनेक प्रसंग घडतात. या इच्छेभोवती नेमकी कोणती गोष्ट आकाराला येते, हे चित्रपटातून पाहायला मिळेल.”Hruta Durgule
निर्मात्या ईशा मुठे आणि श्रुती साठे म्हणतात, “कथेतील साधेपणा ही या चित्रपटाची खासियत आहे. या कथेत मुलांचं विश्व आहे, मात्र त्यातल्या अनेक गोष्टी मोठ्यांनाही आपल्याशा वाटतील. हृता आणि सारंगची जोडी या कथेला आणखी एक वेगळा पैलू देते. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे.”Hruta Durgule