दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत ABVPचा डंका तर NSUI चा सुपडा साफ...!

अध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिवपदावर ABVPचा विजय; Gen Zच्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर निकालाला महत्व.

    19-Sep-2026
DUSU Election ABVP Victory
 
 
ठाणे,(DUSU Election ABVP Victory) : दिल्ली विद्यापीठ छात्रसंघाच्या (DUSU) निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) चारपैकी तीन प्रमुख पदांवर विजय मिळवत आपला प्रभाव कायम ठेवला. अभाविप चे यश डबास अध्यक्ष, रिया छावडी सचिव आणि लक्ष्यराज सिंह संयुक्त सचिव म्हणून विजयी झाले. उपाध्यक्षपद मात्र स्वतंत्र उमेदवार दीपांशू शोकीन यांनी पटकावले. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या NSUIला चारही केंद्रीय पदांपैकी एकही जागा मिळाली नाही.एन एस यु आय चा पूर्णपणे सुपडा साफ झाल्याने जेंझिंचा पाठिंबा हा राष्ट्रवादी विचारांच्या नेतृत्वालाच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे..(DUSU Election ABVP Victory)
 
अध्यक्षपदाच्या लढतीत ABVPचे यश डबास यांनी NSUIचे विजय शंकर मीना यांचा पराभव केला. डबास यांना २४,५७६, तर मीना यांना २२,५२३ मते मिळाली. विशेष म्हणजे उपाध्यक्षपद जिंकणारे दीपांशू शोकीन हे NSUIमधून बंड करून स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते.(DUSU Election ABVP Victory)
 
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’च्या पार्श्वभूमीवर निकाल
 
DUSUचा हा निकाल विद्यार्थी आणि विशेषतः Gen Zशी संवाद साधण्याच्या राजकीय प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘छात्रों की गूंज’ हा विद्यार्थी संवाद कार्यक्रम देशभर राबवला जात असून, आज १९ सप्टेंबर रोजी त्याचा पाचवा टप्पा इंदूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद आणि Gen Zपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू असतानाच दिल्ली विद्यापीठातील निकालात NSUIला एकही केंद्रीय जागा मिळालेली नाही.त्यामुळे देशाच्या राजधानीतील जेंझी ने देशविरोधी तत्वांना खतपाणी घालणाऱ्याना दिलेली ही सणसणीत चपराक असल्याच बोललं जातंय...(DUSU Election ABVP Victory)
 
या निवडणुकीत Gen Zचे प्रश्न, वसतिगृहांची कमतरता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षणातील सुधारणा आणि कॅम्पस सुविधा हे मुद्दे चर्चेत होते. ABVP आणि NSUI दोन्ही संघटनांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रचार केंद्रित केला होता. सुमारे २.७५ लाख विद्यार्थी मतदानासाठी पात्र होते.(DUSU Election ABVP Victory)
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी ABVPच्या विजयाबद्दल दिल्ली विद्यापीठातील युवकांचे अभिनंदन केले. हा विजय युवकांचा सकारात्मक आणि रचनात्मक विद्यार्थी राजकारणावरील विश्वास दर्शवतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.(DUSU Election ABVP Victory)
 
“दिल्ली विद्यापीठातील माझ्या सर्व युवा मित्रांचे ABVPच्या डूसू निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन! हा विजय ‘नेशन फर्स्ट’च्या भावनेत रुजलेल्या सकारात्मक आणि रचनात्मक विद्यार्थी राजकारणावरील युवकांचा कायम असलेला विश्वास आणि ‘विकसित भारत’ाच्या संकल्पनेत योगदान देण्याचा त्यांचा दृढ निश्चय दर्शवतो. विजयी उमेदवारांना आणि या विजयासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांना माझ्या शुभेच्छा,” (DUSU Election ABVP Victory)
- नितीन नबीन,राष्ट्रीय अध्यक्ष-भाजपा..
 
 




संबंधित मजकूर