अनिल कपूरच्या ‘इंडिया के टॉप 1%’ला मिळाली पहिली विजेती; मुंबईच्या बिजल शाहने रचला इतिहास, जिंकले ₹94 लाख !

    19-Sep-2026
 
anil
 
 
 
 
 
मुंबई -Anil Kapoorस्टार प्लसच्या नव्या गेम शो ‘इंडिया के टॉप 1% – द अनिल कपूर शो’ची सुरुवात एका ऐतिहासिक विजयाने झाली. ग्रँड प्रीमियर एपिसोडमध्ये मुंबईच्या बिजल शाहने शानदार खेळ करत शोची पहिली विजेती होण्याचा मान मिळवला आणि तब्बल ₹94 लाखांची रक्कम जिंकली.
बिजलचा हा विजय केवळ बक्षिसाच्या रकमेपुरता मर्यादित नाही. तुम्हाला किती माहिती आहे यापेक्षा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसे पाहता आणि कसा विचार करता, हे अधिक महत्त्वाचे ठरू शकते, हीच या शोची संकल्पना आहे. याच मंचावर बिजलने आपल्या शांत आणि चाणाक्ष खेळाने छाप पाडली. संपूर्ण खेळादरम्यान तिने स्वतःच्या विचारांवर आणि निर्णयांवर विश्वास ठेवला. विशेष म्हणजे बिजलने तिचे पती नीलय मेहता यांच्यासोबत या खेळात सहभाग घेतला होता. नीलयचा खेळातील प्रवास संपल्यानंतरही त्यांनी बिजलला सातत्याने प्रोत्साहन दिले.Anil Kapoor
बिजलच्या ऐतिहासिक विजयाबद्दल शोचा होस्ट अनिल कपूर म्हणाला, “बिजलने पहिल्याच एपिसोडमध्ये दाखवून दिलं की ‘इंडिया के टॉप 1%’पर्यंत पोहोचण्यासाठी फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड आणि स्ट्रीट-स्मार्ट विचार करण्याची गरज आहे. संपूर्ण खेळात ती शांत, सतर्क आणि प्रत्येक क्षणी सजग होती. आमची ग्रँड ओपनिंग यापेक्षा अधिक धमाकेदार होऊच शकली नसती. बिजल आमची पहिली विजेती आहे आणि हा ऐतिहासिक विजय एका महिलेच्या नावावर झाला, याचा मला विशेष अभिमान आहे. ती खऱ्या अर्थाने ‘इंडिया के टॉप 1%’मध्ये आहे!”Anil Kapoor
आपल्या विजयाबद्दल बिजल शाह म्हणाली, “₹94 लाख जिंकणं आणि या शोची पहिली विजेती ठरणं हे अजूनही स्वप्नवत वाटतंय. मी एका वेळी फक्त एका प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं आणि स्वतःवर विश्वास ठेवला. हा विजय माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या वडिलांचे आशीर्वाद आणि माझा मुलगा प्रणितचं नशीब संपूर्ण खेळात माझ्यासोबत होतं, असं मला मनापासून वाटतं. आणि अर्थातच, माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं!”Anil Kapoor
पहिल्याच एपिसोडमध्ये ‘इंडिया के टॉप 1%’ने आपल्या मूळ संकल्पनेची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. कारण कधी कधी तुम्हाला किती माहिती आहे यापेक्षा तुम्ही कसा विचार करता, हेच सर्वात महत्त्वाचं ठरतं. आणि यावेळी आपल्या विचारशक्ती, आत्मविश्वास आणि अचूक निर्णयांच्या जोरावर बिजल शाहने इतिहास रचला आहे.Anil Kapoor
 




संबंधित मजकूर