गणपती विसर्जन मिरवणुकीत भारत मातेचा जयघोष करणाऱ्यांना बॉम्बस्फोटाची धमकी!

तमिळनाडूच्या श्रीविल्लिपुथुरमध्ये तणाव; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    18-Sep-2026   
Srivilliputhur Ganesh Procession Bomb Threat
 
मुंबई (Srivilliputhur Ganesh Procession Bomb Threat) : तमिळनाडूच्या श्रीविल्लिपुथुर येथे निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्याने हिंदूंना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हिंदू मुन्नानीची मिरवणूक मशिदीजवळून जात असताना ढोल वाजवण्यास आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यास दोन तरुणांनी आक्षेप घेतला. त्यांनी मिरवणुकीतील सहभागी व्यक्तींना धमकी देत, “अशा प्रकारे घोषणा दिल्या तर बॉम्ब टाकून तुम्हा सर्वांना ठार करू,” असे म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. (Srivilliputhur Ganesh Procession Bomb Threat)
 
मिरवणुकीला सुरक्षा देण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी काही काळानंतर या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. मात्र, हिंदू कार्यकर्त्यांमधील तणाव कमी करण्यासाठी त्यांना नंतर सोडून देण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न करता दोघांना सोडले. काही तासांच्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती आहे. यामुळे हिंदू समाजात नाराजी निर्माण झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. (Srivilliputhur Ganesh Procession Bomb Threat)
 
हिंदू मुन्नानीचे पदाधिकारी ब्रह्मनायगम यांनी सांगितले की, “गेल्या वर्षीही या मशिदीजवळून मिरवणूक जात असताना चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी युवराज कोसळले आणि त्यांना तीन दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण होईल, अशी आम्हाला भीती होती. आम्ही केवळ ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या; ढोलही वाजवले नाहीत. त्यानंतर काही तरुण मशिदीतून बाहेर आले आणि घोषणा देणे थांबवा, अन्यथा बॉम्बस्फोट करून तुम्हा सर्वांना ठार करू, अशी धमकी दिली. तणाव कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना केवळ ताब्यात घेतले. मात्र, कोणताही गुन्हा दाखल न करता त्यांना सोडून देण्यात आले.” (Srivilliputhur Ganesh Procession Bomb Threat)
 
अरुप्पुकोट्टईतील घटनेचीही चर्चा
 
श्रीविल्लिपुथुरमधील ही घटना १५ सप्टेंबर रोजी अरुप्पुकोट्टई येथे झालेल्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्याच दिवशी घडली. अरुप्पुकोट्टईमध्ये मिरवणुकीला परवानगी देताना पोलिसांनी मार्गातील मशिदी आणि चर्च परिसरातून जाताना ढोल वाजवू नयेत, अशा काही अटी घातल्या होत्या. मिरवणूक पुढे जात असताना भाविकांकडून पारंपरिक पद्धतीने ‘ॐ गणेशा’, ‘जय गणेशा’, ‘भारत माता की जय’, ‘जय काली’, ‘ॐ काली’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी काही धर्मांध मुस्लिम व्यक्तींनी कथितरीत्या मिरवणुकीत प्रवेश करून या घोषणांना आक्षेप घेतला. हिंदू मुन्नानीच्या पदाधिकाऱ्यांशी कथितरित्या मारामारी करण्यात आली तसेच गोंधळ निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनास्थळी मिरवणुकीच्या सुरक्षेसाठी पोलीस उपस्थित असतानाही त्यांनी प्रभावी कारवाई केली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला. अशा प्रकारच्या घटनांमध्ये कारवाई न झाल्यास संबंधितांना पुढील घटनांसाठी प्रोत्साहन मिळू शकते, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे अरुप्पुकोट्टईतील घटनेतील पोलिसांच्या भूमिकेवरून श्रीविल्लिपुथुरमधील १६ सप्टेंबरच्या घटनेतील पोलिसांच्या प्रतिसादावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Srivilliputhur Ganesh Procession Bomb Threat)
 
अरियालूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा आरोप
अरियालूरमध्ये अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि वकील जयराज यांच्यावर गांजाच्या व्यसनाधीन असल्याचा आरोप असलेल्या एका गटाने हल्ला केल्याचे वृत्त आहे. जयराज यांच्यावर रायमोंडा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाजपचे पदाधिकारी मा. वेंकटेशन यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक न केल्यास त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही वेंकटेशन यांनी दिला आहे. (Srivilliputhur Ganesh Procession Bomb Threat)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर