मुंबई (Mohan Bhagwat Education Statement) : शिक्षणाचा उद्देश केवळ करिअर घडवणे हा नसून, मानवाचा सर्वांगीण विकास करणेही आहे. शिक्षणामुळेच मानव आणि प्राणी यांच्यातील भेद स्पष्ट होतो आणि मानवाचा विकास झाल्याशिवाय राष्ट्रनिर्मिती शक्य नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. (Mohan Bhagwat Education Statement)
दिल्लीतील एका संवाद कार्यक्रमात इयत्ता दहावीपासून पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसबत आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी विविध विषयांवरील त्यांच्या प्रश्नांना सरसंघचालकांनी उत्तरे दिली. हा कार्यक्रम आयआयएलएम विद्यापीठ आणि बनियन ट्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. (Mohan Bhagwat Education Statement)
शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले की, त्यांच्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारे पाहिल्यास तरुण पिढी मागील पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक आहे आणि तिच्यात स्वाभाविकपणे अधिक धैर्यही आहे. ‘ब्रेन ड्रेन’ अर्थात देशातील प्रतिभावान तरुणांचे परदेशात स्थलांतर या विषयावर बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या देशाशी जोडलेले राहण्याचे आवाहन केले. परदेशात तरुणांना अनेक संधी मिळू शकतात; मात्र त्यांची ओळख त्यांच्या मातृभूमीशी जोडलेली असते, असे त्यांनी सांगितले. (Mohan Bhagwat Education Statement)
ते म्हणाले, “तुम्हाला परदेशात सर्व काही मिळेल; मात्र तुमची ओळख तुमच्या देशाशी जोडलेली आहे. तुम्हाला तुमच्या देशाने खूप काही दिले आहे. आपले शरीरही भारतातील अन्न आणि पाण्यामुळे पोसले गेले आहे. शरीरासाठी जेवढे आवश्यक आहे तेवढेच स्वतःकडे ठेवा आणि उर्वरित समाज व राष्ट्रासाठी समर्पित करा.” (Mohan Bhagwat Education Statement)
उदाहरण देताना त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाचा उल्लेख केला. या चित्रपटात नीम करोली बाबांचा संदर्भ आहे. त्यांची भेट घेण्यासाठी स्टीव्ह जॉब्सही आले होते, असे त्यांनी नमूद केले. तसेच, स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी औपचारिक शालेय शिक्षण घेतले नव्हते, याचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, भारतात अनेक संत असे होऊन गेले ज्यांनी नियमित किंवा औपचारिक शिक्षण घेतले नव्हते; मात्र त्यांच्या उच्च मानवी गुणांमुळे ते समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व बनले. त्यामुळे आधुनिक शिक्षणासोबतच मानवी गुणांचा विकास करणाऱ्या शिक्षणाचीही गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. (Mohan Bhagwat Education Statement)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक