मुंबई (Kashmiri Hindu Housing Project) : काश्मीर खोऱ्यात पंतप्रधान पॅकेजअंतर्गत कार्यरत असलेल्या विस्थापित काश्मिरी हिंदू कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या निवासी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. २० ठिकाणी मंजूर झालेल्या ६,००० सदनिकांपैकी ५,१७६ सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Kashmiri Hindu Housing Project)
अलीकडील काळात काश्मिरी हिंदू कर्मचाऱ्यांना मिळालेल्या दहशतवादी धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने उर्वरित निवासी आणि संबंधित पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करून तयार सदनिकांचा टप्प्याटप्प्याने पात्र कर्मचाऱ्यांना ताबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत, पुनर्वसन आणि पुनर्निर्माण विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Kashmiri Hindu Housing Project)
बैठकीचे संयुक्त अध्यक्षस्थान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल कुमार सिंह आणि आपत्ती व्यवस्थापन, मदत, पुनर्वसन आणि पुनर्निर्माण विभागाचे प्रधान सचिव चंद्राकर भारती यांनी भूषविले. त्यांनी सांगितले की, बहुतांश निवासी संकुलांमध्ये लिफ्ट, अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था आणि सामुदायिक इमारती यांसारखी पूरक कामे अंतिम टप्प्यात आहेत. सरकारने उर्वरित कामांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवून, आधीच झालेल्या वाटपाच्या आधारे पात्र कर्मचाऱ्यांना तयार सदनिकांचा ताबा देण्याचे निर्देश दिले आहेत. (Kashmiri Hindu Housing Project)
जम्मूमधील विविध विस्थापित छावण्यांतील जुन्या इमारतींच्या दुरुस्ती आणि जीर्णोद्धारासाठी सरकारने ८२.४५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुरखू, नगरोटा, मुट्ठी आणि जगटी येथील २० कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. (Kashmiri Hindu Housing Project)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक