डेनिस कॉस्को या तरूणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही हत्या की आत्महत्या, असा विवाद इटलीमध्ये सध्या सुरू आहे. कारण, दोन दशकांपूर्वी डेनिसच्या आईची इली ला गॅरोफालो हिची हत्या करण्यात आली होती. ती हत्या तिच्या पित्याने केली. कारण, तीने तिच्या पतीच्या गुन्हेगारी क्रूर साम्राज्याविरोधात म्हणजे ‘इंद्रेगेटा माफिया’ गँगविरोधात गेली आणि तिने पतीच्या गुन्ह्याविरोधात साक्ष दिली. त्यामुळे तिच्या पतीने आणि दीराने तिचा खून केला. आपल्या आईच्या खुन्यांना शिक्षा व्हावी, यासाठी डेनिसने साक्ष दिली. तिच्या माफिया पित्याला आणि काकाला जन्मठेपेची शिक्षा झाली. मात्र, असे असताना डेनिसने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येबद्दल आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘इंद्रेगेटा’ ही इटलीतील अत्यंत शक्तिशाली माफिया गँग. या ‘इंद्रेगेटा’चा ड्रग तस्कर कार्लो कॉस्को हा अत्यंत क्रूरकर्मा गुन्हेगार. त्याचा विवाह त्याच्यासारख्याच गुन्हेगार असलेल्या व्यक्तीच्या मुलीशी म्हणजे इली ला गॅरोफालो हिच्याशी झाला. कार्लोशी विवाह झाल्यानंतर गॅरोफालोने या अंधार्या क्रूर जगाचे वास्तव जवळून पाहिले. पैशासाठी आणि आर्थिक सत्तेसाठी किड्या-मुंग्यांसारखे माणसांना चिरडून टाकणे, अपहरण करणे, खंडणी मागणे या चक्रातच कार्लो गुरफटला होता. विशेष म्हणजे, या सगळ्यांत त्याला विकृत आनंद होत होता. लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी, म्हणून तो नित्य नवनवे क्रूर गुन्ह्याचे सत्र सुरू करत असे. हे सगळे पाहून गॅरोफालो हिने कार्लोला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, कार्लोने तिचे तोंड बंद करण्यासाठी तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. शेवटी गॅरोफालो मुलीला घेऊन त्याला सोडून निघून गेली. मात्र, तिचा अंतरात्मा तिला शांत बसू देत नव्हता. ती स्वतःच्या पतीविरोधात पोलिसांकडे साक्ष द्यायला तयार झाली. न्यायालयात केस उभी राहिली. गॅरोफालोच्या साक्षीने कार्लोला १०० टक्के शिक्षा होणारच होती. मात्र, याचदरम्यान कार्लोने त्याच्या भावाला मध्यस्थी करायला सांगितले. ‘मला शिक्षा झाली, तर मुलीच्या भविष्याचे काय, यासाठी तरतूद करायला हवी. त्यासाठी इला ली चर्चा करावी लागेल,’ असा संदेश त्याने भावातर्फे गॅरोफालोला दिला. मुलीच्या भविष्यासाठी गॅरोफालो त्याला भेटायला गेली, मात्र कार्लोने तिचे अपहरण केले. तिचा अनन्वित छळ केला आणि शेवटी तिला गोळ्या घालून ठार मारले. तिचा मृतदेह कधीच कुणाला मिळाला नाही. कारण, तो मृतदेह त्याने अॅसिडच्या टाकीत विरघळवून टाकला.
मात्र, आपल्या आईचा आपल्या पित्यानेच खून केला, अशी ठाम खात्री डेनिसला होती. तिने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा मागोवा घेतला आणि सत्य उघड झाले की, कार्लोनेच गॅरोफालोचा खून करून तिचा मृतदेह अॅसिडमध्ये विरघळवला. अनेक वर्षे न्यायालयात केस सुरू राहिली. शेवटी कार्लोला जन्मठेपेची शिक्षा झाली. यादरम्यान डेनिसने नाव बदलून दुसर्या शहरात वास्तव्य केले. मात्र, नुकतीच तिने आत्महत्या केली. ‘इंद्रेगेटा’ गँगच्या सदस्यांविरोधात जिवाच्या भीतीने कुणीही कधीही साक्ष दिली नव्हती. मात्र, कार्लोच्या पत्नीने आणि मुलीने साक्ष दिली होती. त्यांनी नियम मोडला. त्यामुळे समाजात दरारा कायम राहावा, म्हणून कार्लोने तिचा खून केला आणि पुढे काही वर्षांनी कार्लोच्या टोळीने त्याच्या मुलीचा डेनिसचा खून केला.
बरं, ही टोळी कट्टर धार्मिक आहे. जिथे जातील, तिथे ते ‘येसू’ आणि ‘मेरी’चे चित्र मूर्ती घेऊन जातात. यामुळे जगात ख्रिस्ती धर्मांची नालस्ती होते, पाहून ‘पोप’ने जाहीर केले की, ‘इंद्रेगेटा’ टोळीच्या गुन्हेगारांना ख्रिस्ती धर्मातून बहिष्कृत केले आहे. दुसरीकडे गँगचे म्हणणे आहे की, ते धार्मिक आहेत खरे ख्रिस्ती आहेत. ते नवीन सदस्यांला दिक्षा देताना सेंट मायकलची साक्ष देतात. (बायबलनुसार सेंट मायकल मानवाच्या मृत्यूच्या वेळी उपस्थित असतात आणि आत्म्यांचे वजन करून त्यांना न्याय मिळवून देतात) असो. पोप यांनी या गँगला ख्रिस्ती धर्मातून बहिष्कृत केले. यावर वाटते की, जगभरातील अनेक देशांना गुलाम बनवून त्या देशाच्या जनतेचे हिंसेने धर्मांतरण करणार्या भूतकाळातील पाश्चिमात्य ख्रिस्ती आक्रमणकर्त्यांबाबात किंवा वर्तमानकाळात भोळ्या गरिबांना आमिष देऊन पसवून धर्मांतरण करणार्यांबाबत पोप यांचे म्हणणे काय असेल बरं? असो. तूर्तास डेनिस हिच्या आत्महत्येमुळे इटलीमधील माफिया जग पुन्हा चर्चेत आले, इतकेच!
९५९४९६९६३८