भारताने पाकिस्तान-चीन सीमा आयोगाचा प्रस्ताव फेटाळला!

पाकिस्तानला कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचे ठणकावले

    18-Sep-2026   

India Rejects Pakistan-China Boundary Commission
 
मुंबई (India Rejects Pakistan-China Boundary Commission) : भारताने तथाकथित पाकिस्तान-चीन सीमा संयुक्त आयोगाला नकार देत स्पष्ट केले आहे की, भारतीय भूभागासंदर्भात पाकिस्तान आणि चीन यांच्यात कोणतीही सीमा अस्तित्वात नाही. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे नेहमीच भारताचे अविभाज्य भाग होते, आहेत आणि यापुढेही राहतील. तसेच, पाकिस्तानला बेकायदेशीर आणि बळजबरीने केलेल्या कब्जाखालील भारतीय भूभागासंदर्भात कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. (India Rejects Pakistan-China Boundary Commission)
 
पाकिस्तान-चीन सीमा संयुक्त आयोगाबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले, “यासंदर्भातील वृत्त आमच्या निदर्शनास आले आहे. या विषयावरील भारताची भूमिका स्पष्ट आणि सातत्यपूर्ण आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यात कोणतीही सीमा नाही. त्यामुळे कोणताही कायदेशीर आधार नसलेल्या या तथाकथित संयुक्त आयोगाला आम्ही नाकारतो. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि अविच्छेद्य भाग होते, आहेत आणि कायम राहतील. पाकिस्तानच्या बेकायदेशीर आणि बळजबरीच्या कब्जाखाली असलेल्या भारतीय भूभागासंदर्भात कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्याचा पाकिस्तानला कोणताही कायदेशीर अधिकार नाही. (India Rejects Pakistan-China Boundary Commission)
 
१९६३ मधील तथाकथित ‘चीन-पाकिस्तान सीमा करारा’ला भारताने कधीही मान्यता दिलेली नाही. हा करार बेकायदेशीर आणि अमान्य असल्याची भूमिका भारताने सातत्याने मांडली आहे. या बेकायदेशीर कब्जाखालील भूभागाचा दर्जा बदलण्याच्या किंवा बेकायदेशीर कब्जाला वैधता देण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना भारत ठामपणे विरोध करतो आणि ते नाकारतो. असे कोणतेही प्रयत्न भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला बाधा आणणारे आहेत. (India Rejects Pakistan-China Boundary Commission)
 
भारतीय भूभागासंदर्भात चीन आणि पाकिस्तान यांच्यातील तथाकथित सीमा सहकार्य पूर्णपणे अस्वीकार्य आहे. त्याचा भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम होणार नाही आणि या भूभागांवरील भारताच्या सार्वभौम अधिकाराला त्यातून कोणतीही बाधा येणार नाही. अशा प्रकारचे दिखाऊ प्रकार करण्याऐवजी पाकिस्तानने बेकायदेशीर आणि बळजबरीने ताब्यात घेतलेल्या भागातून तातडीने माघार घ्यावी, असे आम्ही आवाहन करतो, असे रणधीर जयस्वाल म्हणाले. (India Rejects Pakistan-China Boundary Commission)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर