मराठी चित्रपट ऑस्करमध्ये पोहोचला !'गोंधळ' या मराठी चित्रपटाचा ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत प्रवेश !

    18-Sep-2026
 
gondhal
 
 
 
 
मुंबई - Gondhal Oscar Award ९९ व्या अकादमी पुरस्कारांसाठी 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ही घोषणा केली.
मराठी लोकपरंपरेवर आधारित असलेला हा थ्रिलर चित्रपट ऑस्करसाठी 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट' या श्रेणीत सादर केला जाईल. यावर्षी ऑस्करच्या शर्यतीत भारताकडून 'धुरंधर', 'बॉर्डर २' आणि 'हनुमान अंश' यांसह ३३ चित्रपटांनी प्रवेशिका दाखल केल्या होत्या.Gondhal Oscar Award
या वर्षी ऑस्कर पुरस्कारासाठी देशभरातून विविध भाषांमधील एकूण ३३ चित्रपट एफएफआयकडे सादर करण्यात आले. यापैकी सर्वाधिक १४ चित्रपट हिंदी भाषेतील होते.Gondhal Oscar Award
मराठी, तेलगू आणि गुजरातीमधून प्रत्येकी चार, तमिळमधून तीन, तर मल्याळम आणि नागामीमधून प्रत्येकी एक चित्रपट सादर करण्यात आला.33 भारतीय चित्रपटांच्या यादीत 14 हिंदी चित्रपटांचा समावेश आहे: हक, 120 बहादूर, तेरा मेरा नाता, मैं वापस आऊंगा, ओह माय डॉग, बॉर्डर 2, खुंटा, धुरंधर, धुरंधर द रिव्हेंज, गव्हर्नर, 2020 दिल्ली, 21, ओबसेस आणि हनु. हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांतून जोरदार स्पर्धा असूनही ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने बाजी मारली.Gondhal Oscar Award
दोन तासांचा हा मराठी चित्रपट, ग्रामीण महाराष्ट्रातील 'गोंधळ' या लोकपरंपरा आणि धार्मिक विधीवर आधारित एक मानसशास्त्रीय थरारपट आहे. संतोष दावखर यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा, नवविवाहित आनंद आणि सुमन यांच्या घरी रात्रभर चालणाऱ्या गोंधळ विधीभोवती फिरते. या विधी आणि उत्सवादरम्यान, गावकऱ्यांमधील जुने वाद, वैयक्तिक द्वेष आणि राजकीय तणाव समोर येतात.सुमनशी लग्न होऊ न शकल्याने व्यथित झालेला गावातील पाटीलचा मुलगा सरजेराव, हे लग्न स्वीकारायला तयार नसतो आणि हा पवित्र विधी हळूहळू एका गुन्हेगारी आणि रहस्यमय नाटकात बदलतो. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहानी, निषाद भोईर आणि सुरेश विश्वकर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Gondhal Oscar Award
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने चित्रपटाची निवड करण्यासाठी एक विशेष ज्युरी स्थापन केली. या ज्युरी पॅनेलमध्ये पी. शेषाद्री, विजय पाटकर, हितू कानोडिया, शांती कुमार, संदीप पराशर, संजय पाटील, साबू जोसेफ, अनिल थॉमस, विवेक वासवानी, बिजन दासगुप्ता, हासन, वासन आणि तनिष्ठा चॅटर्जी यांसारख्या नामवंत व्यक्तींचा समावेश होता.सर्व प्रवेशिकांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, ज्युरी सदस्यांनी या मराठी थ्रिलरला ऑस्कर २०२७ साठी नामांकित करण्याचा निर्णय घेतला.Gondhal Oscar Award
 




संबंधित मजकूर