मुंबई (अभिनंदन परुळेकर) : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे शुक्रवार दि.१८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅङ आशिष शेलार यांनी देखील यावेळी उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी पोलीस महासंचालक सदानंद दाते, सहपोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा तसेच सचिव व प्रमुख शिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे उपस्थित होते.(C P Radhakrishnan Mumbai Visit 2026)
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेऊन पूजा केली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. (C P Radhakrishnan Mumbai Visit 2026)
यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(C P Radhakrishnan Mumbai Visit 2026)