नाशिक (Nashik Ghar Wapsi) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रलोभने दाखवून ख्रिश्चन धर्मांतर करण्याच्या प्रकारांना हिंदू संघटनांनी केलेल्या प्रयत्नांनंतर आता आळा बसताना दिसतो आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या आठ आदिवासी तालुक्यातील २२ हजार ५०० लोकांची हिंदू धर्मात घर वापसी करण्यात हिंदू संघटनांना आणि सामाजिक संस्थआंना यश मिळाले आहे. गेल्या १० वर्षांपासून गणेशोत्सवासह इतर हिंदू सणांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक खेड्यांत आणि आदिवासी पाड्यांत संपर्क यंत्रणा प्रस्थापित केल्यामुळे हे यश मिळाल्याचे हिंदू संघटनांचे पदाधिकारी सांगत आहेत.(Nashik Ghar Wapsi)
यंदाच्या २०२६ या वर्षात १५०० जणांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. यात कळवण आणि सटाणा तालुक्यातील ७० ते ८० टक्के लोकांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांमुळे आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात धर्मांतर रोखण्यासाठी घरवापसी या चळवळीने जोम धरलेला दिसतो आहे.(Nashik Ghar Wapsi)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या धर्मजागरण श्रेणीतून आणि संघ परिवारातील जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर हा बदल घडला आहे. मुस्लीम धर्मांतराचे आव्हान जिल्ह्यात असतानाच गेल्या तीन-चार दशकांपासून जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये ख्रिश्चन धर्मातंराच्या घटना वाढत असल्याचे हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या समोर येत होते. आर्थिक प्रलोभने आणि प्रसंगी दादागिरी करुन ही धर्मांतरे घडवली जात असल्याची माहितीही या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर आदिवासी गावे, पाड्यांवर जनजागृती करण्याचा निश्चय या कार्यकर्त्यांनी केला.(Nashik Ghar Wapsi)
त्यानंतर या गावांमध्ये, पाड्यांवर १९९० च्या दशकात हिंदू धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात करण्यात आली. अनेक पाड्यांवर आणि गावांमध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी गणेशमूर्तींचे वाटपही करण्यात आले. यातून ग्रामस्थांमध्ये हिंदू धर्माविषयी आपुलकी निर्माण झाली, यातून जागृती सुरु झाली. ज्यांनी आधी ख्रिश्चन धर्म स्वाकीराला होता, त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात यावे यासाठी स्थानिकांकडूनच आग्रह धरण्यात येऊ लागला. २००१ ते २०१२ या कालावधीत हिंदू धर्म, संस्कृतीबाबत जनजागृती होत असतानाच अनेक ठिकाणी संघर्षाचेही प्रसंग आले. मात्र ख्रिश्चन धर्मांतर रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका घेतली. ठिकठिकाणी झालेल्या हिंदू मेळाव्यांमध्ये संत-महात्म्यांच्या उपस्थितीत ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात घरवापसीचे मोठे कार्यक्रम होऊ लागले. या शुद्धीकरणाच्या कार्यक्रमांना २००६ च्या नंतर मोठा प्रतिसादही मिळू लागला. यातूनच गेल्या १० वर्षांत २२, ५०० जणांनी हिंदू धर्मात घरवापसी केल्याचे आता समोर आले आहे. बागलाण आणि कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरवापसी झाल्यानंतर हा प्रयोग आता संपूर्म पश्चिम महाराष्ट्रात राबवण्यात येतो आहे.(Nashik Ghar Wapsi)
अशी झाली घरवापसी
मालेगाव येथे धर्मांध मुस्लिमांनी दुकान लुटल्यानंतर सटाणा तालुक्यातील ताराहाबाद येथे स्थायिक झालो. तेथे हिंदूंचे खिश्चन धर्मांत मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर विविध सण आणि उत्सवांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. त्यातूनच हिंदू बांधवांचे मत परिवर्तन करुन घर वापसी करण्यात यश आले.(Nashik Ghar Wapsi)
- प्रदीप बच्छाव, सदस्य, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, धर्मजागरण परियोजना
फसवून केले धर्मांतर
हिंदू बांधवांना फसवून आणि देवाचा कोप होईल असे खोटे सांगून त्यांचे धर्मांतर करण्यात आले. पण, हळूहळू खरी परिस्थिती त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा मूल हिंदू धर्मात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला.
- शरद शेळके, महाराष्ट्र प्रदेश सचिव, जनजाती कल्याण आश्रम
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक