मुंबई (Plastic Almonds Shirdi) : शिर्डीसारख्या जगप्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र तीर्थक्षेत्री हरतालिका पुजेच्या साहित्यात काही धर्मांध मुस्लिमांनी बनावट बदाम मिसळून भाविकांच्या श्रद्धेशी उघडपणे खेळ खेळल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. रफिक भाई असे एका पुजा साहित्य विक्रेत्याचे नाव असून त्याच्यासह अन्य भेसळखोर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.(Plastic Almonds Shirdi)
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने पूजेचे साहित्य खरेदी करताना प्रसादाच्या पाकिटात प्लास्टिकचे हुबेहूब दिसणारे बदाम असल्याचे रंगेहाथ पकडले. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित विक्रेत्याला ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाल्यानंतर भाविकांमधून तीव्र आक्रोश व्यक्त होत असून अशा समाजकंटकांवर कठोर आणि दाखला ठरेल अशी कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Plastic Almonds Shirdi)
या संतापजनक प्रकारानंतर शिर्डी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून मंदिर परिसर तसेच शहरातील सर्वच पूजा साहित्य विक्रीच्या दुकानांची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. भाविकांच्या श्रद्धेशी खेळ करणाऱ्या, भेसळयुक्त किंवा बनावट साहित्याची विक्री करणाऱ्या कोणत्याही दुकानदाराची गय केली जाणार नाही; त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. (Plastic Almonds Shirdi)
या धक्कादायक प्रकारामुळे स्थानिक हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. "लाखो भाविकांच्या अथांग श्रद्धेशी आणि पवित्रतेशी असा खेळ चालू देणार नाही," असा आक्रमक पवित्रा हिंदुत्ववाद्यांनी घेतला आहे. शिर्डीसारख्या जागतिक दर्जाच्या तीर्थक्षेत्रात अशा प्रकारची भेसळ आणि फसवणूक करणाऱ्या दोषींवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशाराही संघटनांनी प्रशासनाला दिला आहे. (Plastic Almonds Shirdi)
नेवासा येथे धर्मांध मुस्लिम फेरिवाल्यांकडून मॉबलिंचिंग
गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी ईदच्या दुसऱ्या दिवशी धर्मांध मुस्लिम जमावाकडून हिंदूंविरोधात मॉबलिंचिंग झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा शहरात घडली होती. नेवासा शहरातील गणपती चौक ते ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अवैधरित्या उभ्या राहणाऱ्या अवैध फळ विक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. याबाबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष (अहिल्यानगर उत्तर भाग) ऋषिकेश शेटे यांनी नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर झावरे यांना अतिक्रमण हटवण्यासाठी लेखी निवेदन दिले होते. दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३:१५ वाजता प्रशासनाकडून अतिक्रमणावर कारवाई सुरु होणार असतानाच ऋषिकेश शेटे हे आपल्या मित्राच्या स्कोडा गाडीतून आपल्या अंगरक्षकासह गणपती चौकातून जात होते. त्यावेळी प्रशासकीय कारवाईमुळे संतप्त झालेल्या फळ विक्रेते आणि स्थानिक लोकांच्या जमावाने त्यांची गाडी अडवली. आसिफ पठाण व अब्बास बागवान यांच्यासह ६० ते ८० जणांच्या हिंसक जमावाने त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केल्याचे निदर्शनास आले होते. (Plastic Almonds Shirdi)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक