मुंबई (Nalanda temple incident) : बिहारच्या नालंदामध्ये बिहार शरीफच्या शेरपूर-थवाई परिसरातील एका शिवमंदिरात तोडफोड केल्याप्रकरणी तीन अल्पवयीन मुस्लिम मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये मुलांनी मंदिरावर दगडफेक करणे, मंदिर परिसरात लघुशंका करणे आणि शिवीगाळ करणे असे प्रकार दिसून आल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, तीन मुले मंदिराच्या ग्रीलच्या बाहेरून वीटा आणि दगड मंदिराच्या दिशेने फेकताना दिसत आहेत. तसेच त्यांनी मंदिराच्या आवारात लघुशंका केली आणि अश्लील भाषेचाही वापर केल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. (Nalanda temple incident)
शनिवारी सायंकाळी पूजा करण्यासाठी मंदिरात आलेल्या सूरज कुमार यांनी मंदिर परिसरात विखुरलेल्या वीटा आणि दगड पाहिले. त्यांनी सुरुवातीला परिसर स्वच्छ केला; मात्र नंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर दुपारी सुमारे २.४५ वाजता तीन मुले मंदिराजवळ येऊन हे कृत्य करत असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिरात धाव घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, सुमारे चार ते पाच वर्षे वयोगटातील तीन मुलांनी हनुमानजींच्या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि नंतर सोडून देण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडे लेखी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. (Nalanda temple incident)
स्थानिक रहिवाशांपैकी काहींनी या मुलांनी कोणाच्या तरी प्रवृत्तीनुसार हे कृत्य केले असावे, अशी शंका व्यक्त करत यामागील संपूर्ण कटाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली. घटनेनंतर कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देखील मंदिराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली. (Nalanda temple incident)
मंदिराचे पुजारी अमन कुमार म्हणाले, "हा परिसर मुस्लिमबहुल असून येथे आमचे एकमेव मंदिर आहे. येथे काही समाजकंटक वारंवार जमा होतात. या मुलांनी जाणीवपूर्वक मंदिराच्या गेटवर दगडफेक केली आणि मंदिरात लघुशंका केली. यापूर्वीही मंदिरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांमुळे स्थानिक हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत." (Nalanda temple incident)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक