नागपूर आता ‘पर्यटन जिल्हा’

‘संत्र्यांचे शहर’ म्हणून ओळखले जाणारे नागपूर आता पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे.

    16-Sep-2026   

Nagpur Tourism District
 
मुंबई: (Nagpur Tourism District) महाराष्ट्राची उपराजधानी आणि संत्रानगरी अशी वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्याला आता पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. पर्यटनाला चालना देण्याबरोबरच स्थानिक रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी, पर्यटन विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.(Nagpur Tourism District)
 
नागपूर जिल्ह्याला ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैविध्याचा समृद्ध वारसा लाभला आहे. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी असून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नागपूरचे भौगोलिक महत्त्वही मोठे आहे. ऐतिहासिक ‘झिरो माईल स्टोन’ तसेच गोंड आणि भोसले राजघराण्यांच्या काळातील विविध वास्तू व किल्ले हे जिल्ह्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.(Nagpur Tourism District)
 
तसेच या जिल्ह्याला ‘संत्र्यांचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. याशिवाय पेंच राष्ट्रीय उद्यान, उमरेड-कऱ्हांडला यांसारखी अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प यामुळे नागपूरला ‘भारताची व्याघ्र राजधानी’ अशी ओळख मिळाली आहे. रामटेक येथील पुरातन राम मंदिर, जलक्रीडा केंद्र आणि दीक्षाभूमी यांसारखी धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनस्थळेही पर्यटकांचे आकर्षण ठरतात.(Nagpur Tourism District)
 
पर्यटन धोरण-२०१६ अंतर्गत नागपूर जिल्ह्याला यापूर्वीच ‘विशेष पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले होते. आता या निर्णयाच्या आधारे नागपूरला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक, वन्यजीव, धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनसंपदेचा सर्वांगीण विकास करण्यास या निर्णयामुळे चालना मिळणार आहे.(Nagpur Tourism District)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर