विद्यानंद बापट यांना जमात-ए-इस्लामी हिंदचा पाठिंबा

गरज पडल्यास शिष्टमंडळ कायदेशीर मदतही देणार

    16-Sep-2026   
Jamaat-e-Islami Hind supports vidyanand bapat
 
 
मुंबई (Jamaat-e-Islami Hind supports vidyanand bapat) : सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि अतितीव्र आवाजाच्या ध्वनिक्षेपकांच्या वापराविरोधात मोहीम राबवणारे पुण्यातील विद्यानंद बापट यांची जमात-ए-इस्लामी हिंदच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेतली. ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर त्यांच्या मोहिमेला पाठिंबा व्यक्त करत गरज पडल्यास कायदेशीर मदतही देण्याची तयारी शिष्टमंडळाने दर्शवली. या भेटीत बापट यांनी मोहिमेदरम्यान आलेल्या अडचणींवर चर्चा केल्याची माहिती आहे. जमात-ए-इस्लामी हिंदच्या प्रतिनिधींनी बापट यांना त्यांच्या भूमिकेमुळे सामाजिक विरोधाचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करत, ही मोहीम नागरी समस्येकडे लक्ष वेधणारी असल्याचे सांगितले. (Jamaat-e-Islami Hind supports vidyanand bapat)
 
शिष्टमंडळात जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे माध्यम सचिव अरशद शेख आणि पुणे शाखेचे जनसंपर्क सचिव मोहम्मद शोएब यांचा समावेश होता. त्यांनी बापट यांना संस्थेच्या कार्याची माहितीही दिली. बापट यांनी कर्नाटकमधील जमात-ए-इस्लामी हिंद आणि पुण्यातील स्थानिक जमात-ए-इस्लामी हिंद शाखेने गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाकडे डीजेच्या वापरावर निर्बंध घालण्याबाबत केलेल्या निवेदनाचे कौतुक केले. (Jamaat-e-Islami Hind supports vidyanand bapat)
 
वास्तविक बापट यांच्या मोहिमेला काही नागरिक, राजकीय नेते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे. तर काही गणेश मंडळे आणि हिंदू संघटनांनी त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शविला आहे. ध्वनीप्रदूषणाविरोधातील आपली मागणी कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नसून सर्व सार्वजनिक उत्सवांना समानपणे लागू आहे, असे बापट यांचा दावा आहे. या विषयावर त्यांनी लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडेही पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे. (Jamaat-e-Islami Hind supports vidyanand bapat)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर