मुंबईत गणेशोत्सवाची तयारी पूर्ण; महापौर रितू तावडे यांच्याकडून विसर्जन स्थळांची पाहणी

    15-Sep-2026

Mumbai Ganeshotsav 2026
 
 
मुंबई (Mumbai Ganeshotsav 2026) : आगामी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने केलेल्या पूर्वतयारीचा आणि नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी मुंबई शहर विभागात पाहणी दौरा केला. पालिका प्रशासनाने केलेली तयारी समाधानकारक असल्याचे सांगत, गणेशभक्तांच्या सोयीसाठी अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करावेत आणि विसर्जन प्रक्रियेत कोणतेही अडथळे येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. (Mumbai Ganeshotsav 2026)
 
​महापौरांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात 'गेटवे ऑफ इंडिया' येथून केली. त्यानंतर स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी), वरळीतील लोटस जेट्टी, दादरचे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, केळुसकर मार्ग आणि शीव (सायन) तलाव या प्रमुख विसर्जन स्थळांना भेट देऊन व्यवस्थेची चाचणी केली. (Mumbai Ganeshotsav 2026)
 
यावेळी ​महापौर रितू तावडे यांनी महत्वाचे निर्देश दिले.
 
नैसर्गिक विसर्जन स्थळांवरील ताण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त कृत्रिम तलाव उभारणे.
 
​स्वराज्यभूमी येथे फिरती प्रसाधनगृहे वाढवणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे आणि गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती करणे.
 
पुरेशा जीवरक्षकांची नियुक्ती करणे आणि विसर्जनासह इतर सर्व नागरी सुविधा 'विनामूल्य' असल्याचे माहिती फलक सर्व ठिकाणी ठळकपणे लावणे आधी सूचना आहे त्यांनी दिल्या.
या पाहणी दौऱ्यात प्रभाग समिती अध्यक्ष, स्थानिक नगरसेवक आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
'श्रीगणेशोत्सव २०२६' माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
 
पाहणी दौऱ्यानंतर पालिका मुख्यालयातील महापौर दालनात 'पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव २०२६' माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौरांच्या हस्ते झाले. या पुस्तिकेत विसर्जन स्थळे, नागरी सुविधा आणि 'श्रीगणेश गौरव पुरस्कार' स्पर्धेचा प्रवेश अर्ज यांसारखी महत्त्वपूर्ण माहिती समाविष्ट आहे. या प्रसंगी पालिकेचे विविध पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त आणि अभिनेते प्रशांत दामले उपस्थित होते. (Mumbai Ganeshotsav 2026)
 
 
 
 




संबंधित मजकूर