अभाविपच्या सदस्यता अभियानाला कोकणात उत्स्फूर्त प्रतिसाद!

२६० महाविद्यालये, शाळांतून १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वीकारले अभाविपचे सदस्यत्व

    15-Sep-2026   
ABVP Membership Drive Konkan
 
 
मुंबई (ABVP Membership Drive Konkan) : कोकण प्रांतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यता अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अभियानाने एक लाख सदस्यतेचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. आतापर्यंत कोकण प्रांतातील २६० महाविद्यालये व शाळांमध्ये सदस्यता अभियान राबविण्यात आले असून, त्यातून एकूण १,०४,८६५ विद्यार्थ्यांनी अभाविपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यामध्ये ८१,०६६ महाविद्यालयीन आणि २३,७९९ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.(ABVP Membership Drive Konkan)
 
कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांनी महाविद्यालये, शाळा आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष संपर्क साधत सदस्यता अभियान राबविले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक अडचणी, महाविद्यालयीन प्रश्न, विद्यार्थीहिताचे विषय तसेच राष्ट्रनिर्माणातील विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत चर्चा करण्यात आली. या अभियानाला विद्यार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद हा केवळ सदस्यसंख्येच्या रूपातील आकडा नसून विद्यार्थी परिषदेसोबत जोडले जाण्याची विद्यार्थ्यांची वाढती इच्छा दर्शवणारा आहे.(ABVP Membership Drive Konkan)
 
याबाबत अभाविप कोकण प्रांत मंत्री राहुल राजोरिया म्हणाले, “कोकण प्रांतात एक लाख सदस्यतेचा टप्पा पार करणे ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मात्र, आमच्यासाठी ही केवळ संख्या नाही. विविध महाविद्यालये आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी झालेला प्रत्यक्ष संवाद, त्यांनी मांडलेले प्रश्न आणि अभाविपच्या कार्याशी जोडून घेण्याची त्यांनी व्यक्त केलेली इच्छा ही या अभियानाची खरी ताकद आहे. कार्यकर्त्यांनी सातत्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम केले. विद्यार्थ्यांचा हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आगामी काळातही अभाविप विद्यार्थीहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत राहील.”(ABVP Membership Drive Konkan)
 
कोकण प्रांतातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोवा मध्ये सदस्यता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग लक्षात घेता आगामी काळातही अभियान अधिक व्यापक करण्याचा अभाविपचा प्रयत्न राहणार आहे.(ABVP Membership Drive Konkan)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर