मुंबई (Mumbai Metro Ganeshotsav 2026) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत सुरक्षित व सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी एमएमआरडीएच्या महामुंबई मेट्रोने विशेष अतिरिक्त सेवा जाहीर केल्या आहेत. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मेट्रो मार्गिका २ए, ७ व ९ तसेच २बीवरील सेवा रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. सध्या या मार्गिकांवरील शेवटची मेट्रो रात्री ११ वाजता सुटते.(Mumbai Metro Ganeshotsav 2026)
मेट्रो मार्गिका २एवर अंधेरी पश्चिम आणि दहिसर पूर्व, मार्गिका ७ व ९ वर गुंडवली आणि काशिमीरा तसेच मार्गिका २बीवर महाराष्ट्र नगर–मांडले आणि चेंबूर येथून शेवटची मेट्रो रात्री १२.३० वाजता सुटणार आहे. (Mumbai Metro Ganeshotsav 2026)
गणेशोत्सवाच्या काळात दररोज प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोच्या १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणपती मंडप, दर्शन आणि उत्सवासाठी रात्री उशिरापर्यंत बाहेर असलेल्या भाविकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक सुविधाजनक पर्याय उपलब्ध होणार आहे. गणेशोत्सवात मुंबईतील रस्त्यांवरील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता मेट्रोची ही अतिरिक्त सेवा भाविकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ‘गणेशोत्सव २०२६’मध्ये वाहतूक कोंडी टाळून मेट्रोने प्रवास करा आणि गणपती बाप्पाचे दर्शन अधिक सोयीने घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.(Mumbai Metro Ganeshotsav 2026)
आठवड्यानुसार मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या
सोमवार ते शुक्रवार : मार्गिका २एवर २९९ फेऱ्या (+१०), मार्गिका ७ व ९ वर २९० फेऱ्या (+१४) आणि मार्गिका २बीवर १८० फेऱ्या (+१५).
शनिवार : मार्गिका २एवर २४१ फेऱ्या (+१०), मार्गिका ७ व ९ वर २३७ फेऱ्या (+१४) आणि मार्गिका २बीवर १८० फेऱ्या (+१५).
रविवार : मार्गिका २एवर २२३ फेऱ्या (+१०), मार्गिका ७ व ९ वर २१९ फेऱ्या (+१४) आणि मार्गिका २बीवर १८० फेऱ्या (+१५). (Mumbai Metro Ganeshotsav 2026)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.