मुंबई (Modi Express 2026): गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ रविवारी गणेशभक्तांना घेऊन कोकणच्या दिशेने रवाना झाली. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ येथून मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल्वेला मार्गस्थ केले. यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणासाठी रवाना झाली होती.(Modi Express 2026)
गेली १४ वर्षे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी ही विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून दिली जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे आरक्षणासाठी होणारी धावपळ, तिकिटांची वाढती मागणी आणि खासगी वाहनांच्या वाढलेल्या भाड्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘मोदी एक्सप्रेस’ ही सेवा कोकणवासीयांसाठी दिलासा ठरत आहे. मोफत प्रवासाची सुविधा आणि आरक्षित आसनव्यवस्थेमुळे गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी होत आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठी मदत मिळत आहे.(Modi Express 2026)
विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविताना दादर रेल्वे स्थानकाचा परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायणराव राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या जयजयकारानेही परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सलग १४ वर्षे कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल गणेशभक्त चाकरमान्यांनी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.(Modi Express 2026)