लंडन मध्ये विराट कोहली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट

    12-Sep-2026
 
Virat Kohli Eknath Shinde
 
ठाणे :  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यादरम्यान भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याने त्यांची सदिच्छा भेट घेतली. लंडनमध्ये आपण असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोहली भेटण्यासाठी आल्याचे शिंदे यांनी सांगितले.(Virat Kohli Eknath Shinde)
 

“विराट कोहलीसारखा मोठा क्रिकेटपटू अत्यंत साधेपणाने भेटला. यापूर्वीही आमची भेट झाली होती; मात्र यावेळी विविध विषयांवर थेट आणि मनमोकळी चर्चा झाली,” असे शिंदे म्हणाले.(Virat Kohli Eknath Shinde)
 

या भेटीत शिंदे यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह महाराष्ट्रातील विविध विकासकामांवर चर्चा झाली. ‘लाडकी बहीण’ योजना, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम तसेच राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची माहिती शिंदे यांनी कोहली यांना दिली.(Virat Kohli Eknath Shinde)
 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ‘तिसरी मुंबई’, अटल सेतू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांचीही माहिती या भेटीत देण्यात आली. महाराष्ट्राने अलीकडच्या काळात विकासाच्या क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय असल्याचे कोहली यांनी नमूद केल्याचे शिंदे यांनी सांगितले.(Virat Kohli Eknath Shinde)
 

राज्याची अर्थव्यवस्था, स्टार्टअप, पायाभूत सुविधा आणि थेट परकीय गुंतवणुकीतील प्रगतीची माहिती ऐकून कोहली यांनी समाधान व्यक्त केल्याचेही शिंदे म्हणाले. या विकासकामांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार असल्याचे कोहली यांना वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.(Virat Kohli Eknath Shinde)
 

दरम्यान, देशाच्या भावी पिढीला विविध स्पर्धांमध्ये सक्षम कसे करता येईल आणि युवा प्रतिभेला योग्य संधी कशा देता येतील, यावरही दोघांमध्ये चर्चा झाली. या संदर्भात विराट कोहली यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या असून त्याचा महाराष्ट्रासह देशातील युवा पिढीला लाभ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.(Virat Kohli Eknath Shinde)




संबंधित मजकूर