नगरसेवक पद वाचविण्यासाठी रमेश म्हात्रेंची महासभेत हजेरी

सलग गैरहजेरीचा धोका टाळण्यासाठी सभागृहात उपस्थिती; डॉक्टर मारहाण प्रकरणावर विरोधकही गप्प

    12-Sep-2026

Ramesh Mhatre 
 
 
ठाणे (Ramesh Mhatre) : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणात अडचणीत सापडलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपले नगरसेवक पद धोक्यात येऊ नये, यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थिती लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.(Ramesh Mhatre)
 
जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील महासभांना म्हात्रे उपस्थित राहू शकले नव्हते. सलग तीन महासभांना गैरहजर राहिल्यास नगरसेवक पदावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, न्यायालयातील हजेरीनंतर त्यांनी महासभेत उपस्थित राहणे पसंत केल्याचे सांगितले जात आहे.(Ramesh Mhatre)
 
महासभेला म्हात्रे नेहमीप्रमाणे उपस्थित राहणार नसल्याचे गृहीत धरून त्यांची गैरहजेरी नोंदविण्यात आली आणि महापौरांनी सभेच्या कामकाजाला सुरुवात केली होती. मात्र, काही वेळाने म्हात्रे सभागृहात दाखल झाले. त्यानंतर सचिवांनी त्यांच्या गैरहजेरी आणि त्यानंतरच्या उपस्थितीची नोंद सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.(Ramesh Mhatre)
 
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणावरून म्हात्रे यांच्याविरोधात वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रियेमुळे आणि इतर कायदेशीर निर्बंधांमुळे मागील महासभांना ते उपस्थित राहू शकले नव्हते.(Ramesh Mhatre)
 
म्हात्रे यांच्या उपस्थितीवर विरोधी बाकांवरील सदस्य डॉक्टर मारहाण प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करतील, अशी चर्चा होती. मात्र, विरोधकांनी या विषयावर कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने सभागृहात याबाबत चर्चा झाली नाही. म्हात्रे सभागृहातील मागील आसनावर बसले होते. त्यांच्या उपस्थितीची राजकीय वर्तुळात मात्र दिवसभर चर्चा सुरू होती.(Ramesh Mhatre)




संबंधित मजकूर