मुंबई(Ganeshotsav Mumbai) : आगामी श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शहरात सर्वंकष पूर्वतयारी पूर्ण केली असून मुंबईकर नागरिक यंदाचा उत्सव स्वच्छ, सुरक्षित व सुंदर वातावरणात साजरा करतील, असा विश्वास मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.सोमवार पासून सुरू होणाऱ्या या उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी आज, (दि.११) रोजी उपनगरातील प्रमुख विसर्जन स्थळांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.(Ganeshotsav Mumbai)
हा पाहणी दौरा कुर्ला येथील शीतल तलावापासून सुरू झाला. त्यानंतर मुलुंड येथील मोरया तलाव, पवई तलाव, के-उत्तर विभागातील शामनगर तलाव आणि जुहू चौपाटी येथील विसर्जन व्यवस्थांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. ६ फुटांपर्यंतच्या घरगुती मूर्तींसाठी शहरात सुमारे ३८३ कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत, तर मोठ्या मूर्तींसाठी नैसर्गिक तलावांमधील गाळ काढून ते स्वच्छ करण्यात आले आहेत.(Ganeshotsav Mumbai)
विसर्जन स्थळांवर पुरेसे तराफे, पिण्याचे पाणी, जीवरक्षक आणि पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र फिरती शौचालये उपलब्ध करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.पालिकेने मूर्तीकारांना शाडूची माती व पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून दिले आहेत. तसेच निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सूचना उपमहापौरांनी केली.विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत आणणे आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यावर भर देण्यात आला आहे.(Ganeshotsav Mumbai)
या पाहणी दौऱ्यात प्रभाग समिती अध्यक्षा साक्षी दळवी, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा मीनल तुर्डे, सहआयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांच्यासह विविध विभागांचे सहायक आयुक्त आणि पालिका अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Ganeshotsav Mumbai)