
मुंबई - Sayani Guptaसयानी गुप्तांसाठी हे वर्ष खूप नवनवीन प्रोजेक्ट्सच आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. एकीकडे 'आस्मानी' या त्यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या लघुपटाने जागतिक स्तरावर कौतुक मिळवलं आहे तर या यशानंतर आता सयानी हिच्या “आर्या” या अमेरिकन फीचर फिल्ममधील भूमिकेसाठी दोन महत्त्वपूर्ण कलाकारांची निवड करण्यात आली आहे.
यात रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सन हे सयानीसोबत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. भारतीय आणि अमेरिकन चित्रपटसृष्टीत अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा विविध आघाड्यांवर सध्या सायनीच वर्चस्व बघायला मिळतंय.
नील तुली लिखित आणि दिग्दर्शित 'आर्या' या चित्रपटात सयानी मुख्य भूमिकेत आहे. एका प्रतिष्ठित भारतीय संगीत संस्थेतील शिस्तप्रिय पियानो शिक्षिकेची भूमिका साकारत आहेत जी अनिच्छेने उत्तर मिनेसोटामध्ये एका कामासाठी जाते. तिथे एका अडचणीत सापडलेल्या बँड प्रोग्रामला सावरणे आणि त्याच वेळी मायदेशी आपल्या करिअरच्या महत्त्वाकांक्षांना बळ देणे, असे दुहेरी उद्दिष्ट त्यांच्यासमोर असते. मात्र, तिथे पोहोचल्यावर काही गोंधळ निर्माण होतो आणि 'आर्या'ला स्वतःच्या वैयक्तिक असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. Sayani Gupta
सयानी गुप्तांची गुंतागुंतीची आणि विशिष्ट सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेली पात्रे निवडण्याची पद्धत या भूमिकेतूनही दिसून येते. विशेष म्हणजे, यावेळी त्या एका अमेरिकन 'इंडी' फीचर फिल्ममध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहेत. रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सन यांच्यासह या चित्रपटात अर्जुन गुप्ता, आदी रॉय, कायरा लेरॉक्स आणि इक्बाल थेबा यांसारखे नामांकित कलाकारही आहेत, तरीही हा चित्रपट प्रामुख्याने सयानी यांच्या अभिनयाभोवतीच गुंफलेला आहे. या चित्रपटासाठी सयानी गुप्ता रॉस बटलर यांच्यासोबत कार्यकारी निर्माती म्हणूनही काम पाहत आहेत. Sayani Gupta
नील तुली यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून हा त्यांचाही फीचर फिल्ममधील दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट आहे. मात्र, या क्षणाला विशेष महत्त्व प्राप्त होण्याचे कारण म्हणजे, हा क्षण अशा वेळी आला आहे जेव्हा सायनीचा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट 'आसमानी', ज्याचे लेखन आणि निर्मितीही तिनेच केली आहे, वॉशिंग्टन डीसीपासून टोकियो आणि केरळपर्यंत पसरलेल्या आपल्या अभूतपूर्व महोत्सवी प्रवासाला सुरुवात करत आहे. हे दोन्ही प्रकल्प मिळून एका अशा अभिनेत्रीचे दर्शन घडवतात, जिने भारतीय ओटीटीवर आपल्या अभिनयातील खोलीसाठी एक दशकाहून अधिक काळ प्रतिष्ठा मिळवली आहे आणि आता ती आत्मविश्वासाने एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे; एकीकडे ती एक दिग्दर्शिका आहे जिच्या पहिल्या चित्रपटाचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे, आणि दुसरीकडे ती तिच्या पहिल्या अमेरिकन चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. फार कमी कलाकार एका वर्षात इतकी वैविध्यपूर्ण भूमिका साकारतात.Sayani Gupta