मुंबई (अभिनंदन परुळेकर ): (Nashamukt ST Mahamandal Campaign) परिवहन विभागाच्या वतीने राबविण्यात येणारे ‘नशामुक्त एसटी महामंडळ’ अभियान निर्णायक ठरणार असून, या अंतर्गत राज्यभर मद्य आणि अंमली पदार्थ तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित या अभियानातून नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविण्यास प्रतिबंध करण्यासोबतच जनजागृती, नियमित तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार आणि पुनर्वसन यांचा समन्वय साधला जाणार आहे.
रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह करण्यासाठी २०२६ ते २०२९ या कालावधीत प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र!
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्यभर मद्य व अंमली पदार्थ तपासणी अभियान राबविण्याचा निर्णय. नियमित तपासणी, आधुनिक तंत्रज्ञान, जनजागृती आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह… pic.twitter.com/KfwTJHqvIR
प्रस्तावित ‘नशामुक्त एसटी महामंडळ’ अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महानगरपालिका बससेवा, शासकीय वाहने, सार्वजनिक उपक्रम तसेच शासनासाठी कार्यरत कंत्राटी वाहनांचा समावेश करण्यात येणार आहे. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
त्याचबरोबर खासगी बस, पर्यटन वाहने, टॅक्सी, अॅपआधारित कॅब, ऑटोरिक्षा आणि कंत्राटी प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था लागू करण्याचे नियोजन असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसी, कारखाने, कंपन्या, औद्योगिक आस्थापना आणि त्यांच्या कंत्राटदारांच्या कर्मचारी वाहतूक सेवांबरोबरच ट्रक, टँकर, धोकादायक मालवाहतूक, गोदामे, वितरण केंद्रे आणि बंदरांशी संबंधित वाहतूक सेवांचाही या अभियानात विचार करण्यात येणार आहे. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
शाळा-महाविद्यालयीन वाहने, रुग्णालयांची वाहने आणि रुग्णवाहिकांसाठी त्यांच्या कार्याचे स्वरूप लक्षात घेऊन स्वतंत्र तरतुदी करण्याचे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
चालक-वाहकांच्या तपासणीसाठी मशीन खरेदी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, दि. ११ सप्टेंबर रोजी मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस एसटी महामंडळ तसेच परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
मंत्री सरनाईक म्हणाले, सुरक्षित वाहतूक व्यवस्था ही शासनाच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी सुरक्षित आणि सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ‘नशामुक्त एसटी’ अभियानाच्या माध्यमातून चालक आणि वाहकांच्या ड्रग सेवन तपासणीसाठी १ लाख रुपयांची देणगी देण्यात येणार असून, त्यातून तपासणी मशीन खरेदी केली जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
कर्तव्यपूर्व आणि आकस्मिक तपासणी
वाहतूक सेवेचे स्वरूप आणि जोखीम लक्षात घेऊन कर्तव्यपूर्व मद्य तपासणी, नियोजित तसेच आकस्मिक अंमली पदार्थ तपासणी आणि विशिष्ट घटना किंवा वाजवी संशयाच्या परिस्थितीत तपासणी करण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
अंमली पदार्थांची प्राथमिक स्तरावर तात्काळ तपासणी करता यावी, यासाठी विकसित करण्यात आलेल्या विशेष तपासणी किटच्या चाचण्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. या किटच्या साहाय्याने संशयित पदार्थांची प्राथमिक पातळीवर तात्काळ छाननी करता येणार आहे. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसनावर भर
तपासणीदरम्यान व्यसनमुक्तीसाठी मदतीची आवश्यकता असलेल्या चालकांना समुपदेशन, उपचार, पुनर्वसन आणि आवश्यक वैद्यकीय मूल्यमापनाची सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
🗓️ ११ सप्टेंबर २०२६ | 📍 मंत्रालय
आज मंत्रालयात नशामुक्त एसटी महामंडळ अभियानासंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस एसटी महामंडळ तसेच परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह करण्यासाठी ‘नशामुक्त चालक,… pic.twitter.com/HEZckqgTwN
तपासणीदरम्यान सुरक्षिततेचा धोका आढळल्यास पर्यायी चालकाची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. सुरक्षित चालक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केवळ चालकाची नसून वाहनमालक, वाहतूक कंपन्या, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि कंत्राटदारांचीही आहे. मुळे संबंधित नियम, सेवा करार आणि कार्यपद्धतींमध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात येणार आहेत. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
विभागांमध्ये समन्वयाची यंत्रणा
परिवहन, गृह, उद्योग, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय आणि शिक्षण विभागांसह संबंधित विभागांच्या समन्वयातून राज्यस्तरीय नियोजन, जिल्हास्तरीय अंमलबजावणी आणि संस्थास्तरीय उत्तरदायित्वाची यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. (Nashamukt ST Mahamandal Campaign)
या अभियानामुळे नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविण्याच्या घटनांना आळा बसण्यासोबतच प्रवाशांची सुरक्षितता, वाहतूक शिस्त आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील विश्वास वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. (Nashamukt ST Mahamandal Campaign)